Thursday, September 26, 2024

Latest Posts

Shardiya Navratri 2024 : नवरात्रीनिमित्त खास मुंबईतील भुलेश्वर मार्केट सजले, स्वस्त दरात घागरा चोळी उपलब्ध…

Shardiya Navratri 2024 : गणेशोत्सव संपून आता लगबग सुरु झाली आहे ती नवरात्रौत्सवाची. घराघरांत आणि शहरांमधील बाजारात सुद्धा नवरात्रीची लगबग सुरु झालेली पाहायला मिळत आहे. यावर्षी ३ ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. देशभरात विविध भागांत नवरात्री उत्सवादरम्यान देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच अनेक उपवास, व्रत आणि गरबा खेळाला जातो. यादिवसांमध्ये तरुण, तरुणी आणि लहान मुले खास पद्धतीच्या पारंपरिक कपड्यांमध्ये पाहायला मिळतात. त्या विविध पारंपरिक कपड्यांमध्ये तरुण तरुणी गरबा खेळण्याचा आनंद लुटतात.

यासाठी बाजारात दरवर्षी वेगवेगळे नवे ट्रेंडचे कपडे पाहायला मिळतात. यामध्ये घागरा-चोळीची खास व्हरायटी पाहायला मिळते. तसेच नेहमीप्रमाणे यावर्षीही खास भुलेश्वर मार्केट मध्ये ट्रेंडिंग असलेले घागरा-चोळी (चनिया चोळी), धोती- कुर्ता यांसारख्या कपड्यांची उपलब्धता आहे. सर्व वयोगटासाठी जॅकेट, महिला व लहान मुलींचे चनिया चोळी, स्कर्ट, कुर्ती, ब्लाऊज, दुपट्टा असे विविध कपडे स्वस्त दरात मिळून जातात. तसेच मुलांसाठीचे कुर्ती सुद्धा कमी भावात मिळतील. महिला चनिया चोळीचे सेट स्वतः तयार करणार असतील तर वेगळे स्कर्ट,घागरा, ब्लाऊज, दुपट्टा खरेदी करून ते करू शकतात. केवळ महिला आणि मुलींचेच नाही तर मुलांचेही बऱ्याच प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. खास टोप्या हव्या असतील तर या मार्केटमध्ये काश्मिरी टोपी, नेपाळी टोपी, आणि गुजराती पद्धतीची टोपी सुद्धा मिळेल. टोप्यांसारखं दुपट्टेही मुलींना वेगवगेळ्या पॅटर्नचे मिळतील ज्यात कॉटन दुपट्टा, बांधणी दुपट्टा असे ट्रेंडिंग दुपट्टा प्रकार सहज उपलब्ध होतात. त्यामुळे या नवरात्रीनिमित्त तुम्ही गरबा, दांडियासाठी कपड्यांची खरेदी करणार असाल तर भुलेश्वर मार्केटला नक्की भेट द्या.

कपड्यांचे दर:
स्कर्ट आणि घागरा – ७०० रुपयांपासून
चनिया चोळी सेट – १००० रुपयांपासून सुरु
ओढणी – २०० रुपयांपासून सुरू
जॅकेट्स – ३५० रुपयांपासून सुरू

Latest Posts

Don't Miss