Friday, September 27, 2024

Latest Posts

कोण मारणार बाजी? Mumbai University Senate Election 2024 चा आज लागणार निकाल…

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल आज शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर जाहीर होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल आज शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर जाहीर होणार आहे. सकाळी ९ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात वैध आणि अवैध मतांची विभागणी करुन विजयी कोटा निश्चित करण्यात येईल. त्यानंतर पुढील मतमोजणीला सुरुवात होईल. मुंबईतील राजकीय वर्तुळात वर्चस्व राखण्याच्यादृष्टीने सिनेट निवडणूक (mumbai university senate election) ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नेतृत्त्वाखालील युवासेनेने (Yuvasena) वर्चस्व राखले आहे. मात्र, यंदा भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) सिनेटची निवडणूक जिंकण्यासाठी संपूर्ण जोर लावला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या १० नोंदणीकृत पदवीधरकांच्या जागांकरिता मंगळवारी २४ सप्टेंबर २०२४ रोजी मतदान पार पडले होते. आज या निवडणुकांची मतमोजणी केली जाणार आहे. या १० जागांवरील निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण ३८ मतदान केंद्रावर आणि ६४ बूथवर सिनेट निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीच्या मतदारांची एकूण संख्या १३,४०६ इतकी आहे. मात्र २४ सप्टेंबरला झालेल्या सिनेट निवडणुकीत एकूण मतदानाच्या फक्त ५५ टक्के मतदान झालं. या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे ठाकरे की भाजप कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

 

कोणत्या संघटनेचे किती उमेदवार रिंगणात ?

ठाकरेंची युवा सेना – १० जागांवर १० उमेदवार
अभाविप – १० जागांवर १० उमेदवार
८ इतर उमेदवार असे एकूण २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत

सिनेट निवडणुकीसाठी अभाविपच्या उमेदवारांची नावे
हर्षद भिडे
प्रतीक नाईक
रोहन ठाकरे
प्रेषित जयवंत
जयेश शेखावत
राजेंद्र सायगावकर
निशा सावरा
राकेश भुजबळ
अजिंक्य जाधव
रेणुका ठाकूर

ठाकरेंच्या युवासेनेच्या उमेदवारांची नावे
प्रदीप सावंत
मिलिंद साटम
परम यादव
अल्पेश भोईर
किसन सावंत
स्नेहा गवळी
शीतल शेठ
मयूर पांचाळ
धनराज कोहचडे
शशिकांत झोरे

हे ही वाचा:

CM Eknath Shinde मुंबई खड्डेमुक्त करणार होते, एवढ्या गंभीर परिस्थितीत ते कुठे होते? Aaditya Thackeray यांचा सवाल

एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी आज सहाव्यांदा येणार होते सुप्रिया सुळे यांनी करून दिली आठवण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss