Friday, September 27, 2024

Latest Posts

पुण्यात मेट्रोचं उद्घाटन न झाल्यामुळे मविआ आक्रमक, आंदोलकांना आवरताना पोलिसांची दमछाक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा कालचा(गुरूवारी) होणारा पुणे दौरा रद्द (PM Modi Pune Visit) मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा कालचा(गुरूवारी) होणारा पुणे दौरा रद्द (PM Modi Pune Visit) मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आला. मोदींच्या हस्ते काल सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार होते. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही होणार होते. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा करण्यात आला आहे. त्यानंतर विरोधकांनी दौरा रद्द झाला म्हणून सत्ताधारी नेत्यावर हल्लाबोल केला

शिवाजीनंगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी मविआच आंदोलन सुरू असून कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाले आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाच उद्घाटन होणार होत, मात्र पावसामुळे त्यांचा पुणे दौरा रद्द झाला आणि हे उद्घाटनही लांबणीवर पडलं. मात्र यामुळे पुण्यातील प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचा आरोप केला जात आहे.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आता येत्या रविवारी या मेट्रो मार्गाचं ऑनलाइन उद्घाटन करणार आहेत. मात्र त्या आधीच महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनबाहेर त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू आहे. नरेंद्र मोदी हाय हाय अशा घोषणाही देण्यात आल्या आहेत.

मोदी पावसाला घाबरून पुण्यात येत नाही, हा पुणेकरांचा अपमान आहे. हा अपमान आम्ही कधीच विसरणार नाही. मेट्रो सेवा प्रवाशांसाठी लवकरात लवकर सुरू झालीच पाहिजे ही आमची मागणी आहे. तुमच्यात दम नाही, पण आमच्यात दम आहे, असे म्हणत एका कार्यकर्त्याने संतप्त प्रतिक्रिया देत टीका केली. पुण्याच्या जनतेला वेठीस धरू नका. तुमच्याकडे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या हस्ते उद्घाट का नाही केलं ? आम्ही एवढा टॅक्स भरतो, तरी या गोष्टींसाठी आम्हाला त्रास का देता. ही मेट्रो आमच्या पैशांतून सुरू झाली आहे, कोणाच्या बापाची नाहीये असे म्हणत संतप्त कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली. लोकांसाठी ही मेट्रो आहे, त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने ताबडतोब ही मेट्रो सुरू केली पाहिजे. त्यासाठी हे आंदोलन सुरू आहे, अशी प्रतिक्रिया एका महिलेने दिली.

काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन सुरू झालं आहे, मोदींच्या येण्याची वाट पाहण्याची गरज नाही, सामान्यांचे पैसे आहे, त्यांचा अपव्यय होत आहे, काल मोदींनी मेट्रोचं ऑनलाईन पध्दतीने का लोकार्पण केलं नाही, असाही सवाल नेत्यांनी उपस्थित केला आहे. आजच्या आज मेट्रो स्टेशनचं उद्घाटन करावं अशी मागणी मविआकडून करण्यात येत आहे. आक्रमक झालेले कार्यकर्ते मेट्रो स्टेशनच्या आत घुसण्यााठी प्रयत्न करत आहेत. मात्र याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मेट्रो स्टेशनच्या आत जाण्याची परवानगी नसल्याने पोलिस त्यांना रोखत आहेत. मात्र त्यामुळे आंदोलक आणि पोलिस यांच्यात बराच वाद सुरू असून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मेट्रो सुरू होईपर्यंत घरी परत जाणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली असून मेट्रो स्टेशनबाहेरील वातावरण एकंदर खूप तापल्याचं दिसत आहे.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde मुंबई खड्डेमुक्त करणार होते, एवढ्या गंभीर परिस्थितीत ते कुठे होते? Aaditya Thackeray यांचा सवाल

एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी आज सहाव्यांदा येणार होते सुप्रिया सुळे यांनी करून दिली आठवण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss