Saturday, September 28, 2024

Latest Posts

लााडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले… पैसे देण्यापेक्षा….

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका या जाहीर होणार आहेत. आणि या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष ॲक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच एकीकडे मात्र राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आणली आहे.

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका या जाहीर होणार आहेत. आणि या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष ॲक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच एकीकडे मात्र राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आणली आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे असे आरोप आता सध्या सातत्याने होत आहेत. विरोधकांकडून हे आरोप मोठ्या प्रमाणात केले जात आहेत मात्र तरी देखील या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून लाडकी बहिणी योजनेचा प्रचार जोरदार करण्यात सत्ताधारी पक्ष मात्र मग्न आहे. त्याचबरोबर या योजनेचे पैसे देखील खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात घोषणा झालेल्या या योजनेसाठी आतापर्यंत लाखो महिलांनी अर्ज केले आहेत आणि अनेकांना या योजनेचे हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा देखील झाले आहेत. ही योजना जाहीर करून जवळपास दोन ते तीन महिने होत आले परंतु विरोधकांचे टीका करणे काही थांबत नाही आहे. अशातच आता आणखीन एका नेत्यांनी या योजनेवर जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महत्वाचं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे कसून तयारीला लागली असून राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. मात्र आगामी विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते झटून कामाला लागले असून त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काल आणि आज ( २७-२८ सप्टेंबर) विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस असून आज ते पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांचा आढावा घेत आहेत. नागपूर, चंद्रपूर,भांडारा,गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्याचा त्यामध्ये समावेश आहे. तर काल त्यांनी पश्चिम विदर्भातील अमरावती,अकोला,यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्याचा आढावा घेतला.

लााडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंची नाराजी

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी अमरावतीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना लाडकी बहीण योजनेविषयी वक्तव्य केलं. त्यावेळी ते काय म्हणाले जाणून घेऊया…

1) ऑक्टोबरचा पहिला हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्यात पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे नसणार.

2) सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर त्याचा राज्यावर परिणा होईल.

3) राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर हे चुकीचं आहे.

4) महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणले पाहिजे, रोजगार दिला पाहिजे.

5) समाजातील कोणताही घटना फुकट काही मागत नाही.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde मुंबई खड्डेमुक्त करणार होते, एवढ्या गंभीर परिस्थितीत ते कुठे होते? Aaditya Thackeray यांचा सवाल

एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी आज सहाव्यांदा येणार होते सुप्रिया सुळे यांनी करून दिली आठवण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss