Saturday, September 28, 2024

Latest Posts

‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला ‘या’ अभिनेत्याला पाहून चाहते चिंतेत

ग्रँड प्रीमियरच्या व्हायरल  झालेल्या एका व्हिडियोमध्ये एक व्यक्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र या अभिनेत्याकडे पाहून त्याच्या सर्व चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

“धर्मवीर २” (Dharmveer 2) चित्रपट नुकताच रिलीज झाला असून सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. मुंबईमध्ये मोठ्या धुमधडाक्यात या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर पार पडला होता. अनेक दिग्गज कलाकारांनी या ग्रँड प्रीमियरला हजेरी लावली होती. या प्रीमियरचे फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ग्रँड प्रीमियरच्या व्हायरल  झालेल्या एका व्हिडियोमध्ये एक व्यक्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र या अभिनेत्याकडे पाहून त्याच्या सर्व चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

“धर्मवीर २” चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला एका मराठी अभिनेत्याला पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. या अभिनेत्याला पाहून त्याला ओळखणेही कठीण झाले होते. या अभिनेत्याची शरीरयष्टी पाहता चाहत्यांना तो आजारी तर नाही ना ? असा प्रश्न पडला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आणि सर्वांना काळजी वाटणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ‘दुनियादारी’ (Duniyadari) चित्रपटातील सर्वांचा लाडका सुशांत शेलार (Sushant Shelar) आहे. या अभिनेत्याने ‘दुनियादारी’ या चित्रपटाद्वारे चाहत्यांच्या मनावर छाप पाडली होती. ‘दुनियादारी’ या चित्रपटातील “हम सस्ती चीजों का शौक नहीं रखते”, हा त्याचा चित्रपटातील डायलॉग खूप प्रसिद्ध झाला होता.

“धर्मवीर २” चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला सुशांत शेलार या अभिनेत्याने हजेरी लावली होती. अभिनेता सुशांत शेलार खूप बारीक झाला आहे. तो आजारी असल्याचं अनेकांना वाटत होते. त्यामुळे चाहते त्याची काळजी करताना दिसत आहे. सुशांत शेलार या अभिनेत्याच्या चाहत्यांची काळजी आता दूर होणार आहे. कारण सुशांत शेलार आजारी नसून त्याच्या आगामी चित्रपटाच्या भूमिकेसाठी त्याने आपले वजन कमी केल्याची बातमी समोर आली आहे. त्याचाच आगामी चित्रपट येत्या नोव्हेंबरामध्ये प्रदर्शित होणार आहे. सुशांतच्या आगामी चित्रपटात नेमकी सुशांतची भूमिका काय असेल? त्याने कोणत्या भूमिकेसाठी वजन कमी केले आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता नोव्हेंबरामध्ये प्रेक्षकांना मिळणार आहेत.

हे ही वाचा:

भाजप नेत्याने केला जोरदार पलटवार, ‘चिंगम‘ राऊतांनी ‘सिंघम‘ फडणवीस यांची चिंता करू नये…

अंगावर पट्टे ओढून कोणी वाघ होत नाही, खरा वाघ मातोश्रीवर बसलाय: सिनेट निवडणुक निकालावरून Ambadas Danve यांचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss