Saturday, September 28, 2024

Latest Posts

Shardiya Navratri 2024: नवरात्रीमध्ये वापरले जाणारे मटके पर्यावरण पूरक

नवरात्रीमध्ये बनवले जाणाऱ्या मटक्यांना 'गरबा' म्हंटले जाते. या मटक्यांना उन्हाळ्यापासून बनवायला सुरुवात होते त्यानंतर गणेश विसर्जनानंतर त्या मटक्यांना सजावट करण्यास सुरुवात करतात.

सध्या बाजारात नवरात्री उत्सवाची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी नवरात्रौत्सव 3 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. महाराष्ट्रातही विविध भागांमध्ये नवरात्रीदरम्यान देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाते. कुंभार जातीच्या महिलेच्या परिवारात गेल्या ८ पिढ्यांपासून मटका बनवण्याचे काम १२ महिने केले जातात. नवरात्रीमध्ये बनवले जाणाऱ्या मटक्यांना ‘गरबा’ म्हंटले जाते. या मटक्यांना उन्हाळ्यापासून बनवायला सुरुवात होते त्यानंतर गणेश विसर्जनानंतर त्या मटक्यांना सजावट करण्यास सुरुवात करतात. एक गरबा सजवण्यासाठी अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागतो. कट आउट गरबा, देवीच्या चेहरा देखाव्याचे गरबा, छोटे गरबा, मोठे गरबा अशा अनेक देखाव्यांचे गरबा मिळतात. याआधी ट्रॅडिशनल गरबा बनवले जायचे. ते सफेद रंगाचे गरबा असून त्यानंतर आता काही वर्षापासून या गरब्यांना रंगवून सजवण्यास सुरुवात झाली.

सध्पया नवरात्रीमध्ये पर्यावरण पूर्वक गरब्याला मूग डाळ, तांदूळ, गहू अशा धान्याने सजावट करून देखील बनवून दिले जातात. या ठिकाणी गरब्याची साइज १ ते ५ असून १०० पासून ते ३००० रुपये अश्या भावात मिळतात. कॅनडा, लंडन त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून गरबा घेण्यासाठी काही दिवसा आधीपासून नागरिक ऑर्डर देऊन ठेवतात. ज्या पद्धतीने गणपती बापाची स्थापना होते त्याच पद्धतीने या गरब्याचेदेखील घरी स्थापना करून नऊ दिवस पूजन केले जाते. गणपती बाप्पाच्या पर्यावरण पूरक मूर्त्या बनवण्याचा संदेश दिला जातो त्याच पद्धतीने पर्यावरण पूरक गरबा देखील वापरावे, असा संदेश दिला जातो.

ज्या पद्धतीने गरब्यांना सजावट केली जाते त्याला वापरणारे साहित्य हे विसर्जनाच्या वेळी पाण्यामध्ये विसर्जित होत नाही. मटकी मातीची असल्याने तो विरघळून जाते, मात्र त्या मटक्याला सजवण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य हे विसर्जन होत नाहीत. त्या साहित्याने समुद्राला हानी निर्माण होऊ शकते. जर पर्यावरण पूर्वक गरबा वापरले तर विसर्जनाच्या वेळेस गरबा हे मातीचे असल्याने पाण्यामध्ये विरघळून जाते आणि त्याच्यावर सजावटसाठी लावलेले धान्य हे पाण्यातील मासे खातात. प्रत्येक नागरिकांनी जर पर्यावरण पूर्वक गणपती बाप्पाची मूर्ती आणि गरबा बनवण्याची इच्छा व्यक्त केली तर येणाऱ्या काळात आपल्याला पर्यावरण पूर्वक गरबा आणि मुर्त्या पाहायला मिळतील.

हे ही वाचा:

भाजप नेत्याने केला जोरदार पलटवार, ‘चिंगम‘ राऊतांनी ‘सिंघम‘ फडणवीस यांची चिंता करू नये…

अंगावर पट्टे ओढून कोणी वाघ होत नाही, खरा वाघ मातोश्रीवर बसलाय: सिनेट निवडणुक निकालावरून Ambadas Danve यांचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss