spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दसरा मेळावा शिवतीर्थावरच… उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

राज्यातून वेदांता - फॉक्सकॅान प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये जात असताना सध्याचं राज्य सरकार काय करत होतं असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

राज्यातून वेदांता – फॉक्सकॅान प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये जात असताना सध्याचं राज्य सरकार काय करत होतं असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेना भवनमध्ये झालेल्या पदाधिकारी बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावरच होणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे. त्यांच्याकडे प्रकल्प गेला, पण राज्य सरकार त्यावेळी काय करत होतं? दोन महिन्यात फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? वेदांता आणि फॉक्सकॅान सारख्या कंपन्या राज्याबाहेर गेल्यामुळे राज्याचं नुकसान झालं आहे. सत्ताधाऱ्यांनी याचं आत्मपरीक्षण करावं.” तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असे देखील स्पष्ट केले आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षी शिवतीर्थावर होतो. पण या वर्षी एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर त्यांनीही दसरा मेळावा घेण्याचं नियोजन केलं आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी आता उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला नाही. एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर त्यांनी आपला गटच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या गटातील आमदार सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान मिळावं यासाठी अर्ज केला आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थवर होणार की नाही याबाबत संभ्रम असताना आज उद्धव ठाकरे यांनी बैठकीत यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “यंदाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार. त्याबद्दल कोणताही संभ्रम ठेवू नका. त्यासाठी मुंबई महापालिकेमध्ये रिमांइंडर अर्जही देण्यात आला आहे.” तसेच शिवसेनेचा २१ तारखेला पदाधिकारी मेळावा होणार आहे. त्यासाठीही शाखा स्तरावर बैठका घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

हे ही वाचा:

“चित्ता आणा किंवा सिंह, आम्हाला आमच्या हक्काचा वाटा हवा” बागचा ग्रामस्थांचा त्यांच्या हक्कांसाठी लढा

…म्हणून चित्त्यांसाठी करण्यात आली मध्यप्रदेशातील ‘ कुनो ‘ ठिकाणाची निवड

PM Narendra Modi Birthday 2022 : पंतप्रधानांच्या ७२ व्या वाढदिवसानिम्मित शुभेच्छांचा वर्षाव, वाचा कुणी कुणी दिल्या शुभेच्छा!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss