Sunday, September 29, 2024

Latest Posts

अत्याधुनिक उद्यान विरुंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक शहरात गोदावरी नदीच्या काठावर साडेसात एकरात साकारण्यात आलेले उद्यान जागतिक दर्जाचे व तेवढेच दर्जेदार आहे.

नाशिक शहरात गोदावरी नदीच्या काठावर साडेसात एकरात साकारण्यात आलेले उद्यान जागतिक दर्जाचे व तेवढेच दर्जेदार आहे. या उद्यानामुळे नागरिकांना विरुंगळ्यासाठी हक्काचे ठिकाण मिळाले आहे. या उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित शोसाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान लोकार्पण सोहळा आज सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार संजय शिरसाट, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या उद्यानात सर्व तरुण उद्योजकांसाठी उपयोगी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे. ते उपयुक्त ठरेल. तसेच उत्तम कलादालन, साहसी खेळांचा समावेश आहे. देशामध्ये मोठे होईल अशा प्रकारचे एडवेंचर पार्क होत आहेबाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे अभूतपूर्व होती. व्यंगचित्रे, छायाचित्रे, बोरस्ते यांच्या प्रयत्नाने या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानामध्ये पाहावयास मिळणार आहेत. ही आनंदाची बाब आहे. विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण निर्माण करणे गरजेचे आहे. चांगले रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो आणि पायाभूत सुविधांबरोबरच उद्यानेही आवश्यक आहेत. धकाधकीच्या आयुष्यामध्ये क्षणभर विश्रांती या उद्यानाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या उद्यानात मोठया प्रमाणात विविध प्रकारची झाड आहेत आणि सर्वच बाबतीत परिपूर्ण हे उद्यान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्य शासन वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती साधत आहे. पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. महात्मा जोतिराव फुले योजनेत शासनाने आता दीड लाखांऐवजी पाच लाख रुपयांची मर्यादा केली आहे. त्याचा लाभ होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मगाव भगूरमधील विविध विकास कामांसाठी शासनाने ४० कोटी मंजूर केलेले आहेत. त्यापैकी १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Dharmaveer 2 सिनेमावर वाद, सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, म्हणाले…

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss