Sunday, September 29, 2024

Latest Posts

पुण्यातील मेट्रो मार्गिकेचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्धाटन; म्हणाले, आठ वर्षांत मेट्रोचा एक पिलर उभा राहिला नाही…

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे, गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग (Pune Metro) आजपासून प्रवाशांसाठी सुरू झाला आहे.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे, गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग (Pune Metro) आजपासून प्रवाशांसाठी सुरू झाला आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मेट्रो मार्गाचं पंतप्रदान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे. ऑनलाईन पध्दतीन नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी या मेट्रोला (Pune Metro) हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) हे पुण्यात उपस्थित आहेत. आज दुपारी ४ वाजल्यानंतर हा मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी पुणेकरांना संबोधित केलं. लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना माझा नमस्कार…, असं म्हणत मोदींनी भाषणाची सुरुवात केली.

पुण्यातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना माझा नमस्कार. दोन दिवसांपूर्वी मला अनेक मोठ्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि शिलान्यासासाठी पुण्यात यायचं होतं. पण पावसाने कार्यक्रम रद्द झाला. त्यात माझं नुकसान झालं. कारण पुण्याच्या कणाकणात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती आहे. अशा पुण्यात येणं हे ऊर्जावान बनवणारं आहे. माझा मोठा लॉस आहे, मी पुण्यात येऊ शकलो नाही. पण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमचं दर्शन करण्याची संधी मिळाली. पुण्याची धरती महान विभूतींची आहे. महाराष्ट्राच्या विकासाची नवी साक्षीदार होत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

पुण्यात मेट्रो खूप आधी येण्यास पाहिजे होती. परंतु मागील काही दशकांत देशातील शहरांचा विकास झाला नाही. प्लॅनिंग आणि व्हिजनचा अभाव राहिला. कोणतीही योजना पूर्ण होण्यासाठी अनेक दशके लागत होती. त्या जुन्या वर्क कल्चरमुळे मोठे नुकसान देशाचे आणि पुण्याचे झाले आहे. मागील सरकारने आठ वर्षांत मेट्रोचा एक पिलर उभे करु शकले नाही. आमच्या सरकारे मेट्रोचा पुण्यात सर्वत्र विस्तार केला. विकास प्रमाणे महिलांच्या बाबतही मागील सरकारचा दुजाभाव होता, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. ते म्हणाले, मागच्या सरकारने महिलांची एन्ट्री बंद केली होती. मुलींना शाळेचे दरवाजे बंद होते. मुली मोठ्या झाल्यावर त्यांना शाळा सोडावी लागायची. सैनिक शाळेत महिलांना प्रवेश नव्हता. प्रेगन्सीमध्ये महिलांना नोकरी सोडावी लागायची. आम्ही जुन्या सरकारच्या जुन्या मानसिकतेला बदललं.

पुण्यात मेट्रो सुरु करण्याचा निर्णय २००८ मध्ये झाला होता. परंतु काम २०१६ मध्ये सुरु झाले. आमचे सरकार २०१४ मध्ये आला. त्यानंतर या प्रकल्पाच्या मार्गात असलेल्या अडचणी दूर केल्या. त्यानंतर २०१६ मध्ये मेट्रोची कामे सुरु झाली. आता पुणे मेट्रोचे घौडदौड सुरु आहे. २०१६ पासून आतापर्यंत पुणे मेट्रोचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. जुना विचार आणि कार्यपद्धती असती तर एकाही कामे पूर्ण झाली नाही.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे: Aaditya Thackeray

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss