Sunday, September 29, 2024

Latest Posts

Navratri 2024 : नवरात्रीच्या उपवासासाठी ट्राय करा चविष्ट वरईचे कटलेट

Navratri 2024 : आता काही दिवसात नवरात्री उत्सव येत आहे . नवरात्री उत्सवात अनेकजण उपवास करतात. जे लोक नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात त्यांना साबुदाणा खिचडी, वरईचा भात खाऊन कंटाळाही येतो. अश्यावेळी काही नवीन काय खावे असा प्रश्न पडला असेल तर जाणून घ्या वरईच्या वेगळ्या डिशबाबत या पौष्टिक डिशच्या सेवनातून तुम्हाला प्रोटीन,कार्बोहायड्रस मिळतात. उपवासामध्ये तुम्हाला ह्याच्या सेवनातून स्फूर्ती मिळते. वरई पासून तुम्ही अनके वेगवेगळे पदार्थ बनवू शकतात. जसे की खिचडी,पुरी,डोसा,चिल्ल,कचोरी,खीर बनवू शकता. तुम्ही वरईच्या भातापासून कटलेटसुद्धा बनवू शकता. तर जाणून घ्या रेसिपी…

वराईच्या कटलेटसाठी लागणारे साहित्य –

एक कप शिजवलेला वराईचाभात
एक उकडलेला बटाटा
एक कप किसलेले गाजर
एक छोटा चमचा जिरे
दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
एक छोटा चमचा काळे मीरे
एक चमचा आमचूर पावडर
चवीनुसार सेंधव मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
तेल

कटलेट बनवण्याची कृती –

एका पातेल्यामध्ये शिजवलेला वराईचा भात घ्या. त्या वराईच्या भातामध्ये उकडलेला बटाटा मॅश करून टाका आता त्यामध्ये किसलेले गाजर,बारीक चिरलेली कोथिंबीर,हिरवी मिर्ची,जिरे,आमचूर पावडर, काळे मीरे, आणि चवीनुसार मीठ घालून चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या.

आता या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल बनवून त्याला कटलेटप्रमाणे शेप द्या. पॅनला गॅसवर ठेवा त्या पॅनवर थोडं तेल घाला. आता एकावेळी तीन ते चार कटलेट पॅनमध्ये घालून त्याला मंद आचेवर शिजू द्या. कटलेट दोन्ही बाजूनी खरपूस आणि गोल्डन ब्राउन होईपर्यंत शिजून घ्या. चांगले शिजल्यावर ते एका प्लेटमध्ये कडून घ्या. आता तुमचे उपवासाचे कटलेट तयार आहे.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकांच्या निकालानंतर ठाकरे गटाने विरोधकांना डिवचलं, बाप को हात लगानेसे पहले…

‘मुंबईत हायअलर्ट’? दहशतवादी मोठ्या हल्ल्याची भीती, पोलीस ऍक्शन मोडवर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss