Monday, September 30, 2024

Latest Posts

Navratri 2024 : दुर्गा देवीचे अनोखे मंदिर, जिथे देवीच्या चमत्कारासमोर औरंगजेबालाही फुटला घाम… जाणून घ्या रंजक आख्यायिका

Navratri 2024 : नवरात्री उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यंदा ३ ऑक्टोबरला देवीची घटस्थापना होणार आहे. हिंदू धर्मा मध्ये नवरात्रीला अत्यंत महत्त्व आहे. या नऊ दिवस नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नवरात्रीच्या ९ दिवसामध्ये देवीचा जागर केला जातो. नवरात्रीमध्ये देवीची मनोभावाने पूजा केल्याने सर्व भक्तांचे संकट दूर होतात, असे मानले जाते. पूजा व्यतिरिक्त या दिवसांमध्ये अनेक जण देवीच्या अनेक सुप्रसिद्ध मंदिरांना भेट देतात. आपल्या देशामध्ये असेही एक चमत्कारी मंदिर आहे जिथली आख्ययिका ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या देवीच्या मंदिरामध्ये औरंगजबाने मागितली होती माफी.

देवीची आख्ययिका –

नैना देवी कामाख्यादेवी, वैष्णो देवी आणि चामुंडा देवी या मंदिराबदल जवळपास सर्वांनाच माहिती आहे. त्याचप्रमाणे देशामध्ये असेही एक मंदिर आहे, जिथली आख्ययिका अवघ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. हे मंदिर राजस्थानमध्ये जीन माता मंदिराच्या नावाने सुप्रसिद्ध आहे, हे एक दुर्गा मंदिर आहे,ज्याला अनेक भाविक एक चमत्कारी मंदिर म्हणून ओळखतात. या दुर्गा मंदिराविषयी काही रंजक गोष्टी आहेत. १२०० वर्षांपूर्वीचा जुना इतिहास, जीन माता मंदिराचा इतिहास फार जुना आणि प्राचीन आहे. या मंदिराबाबत असे सांगितले जाते की हे मंदिर सुमारे १२०० वर्षापूर्वीबांधले गेले होते. अनेकदा या मंदिराची दुरुस्ती आणि पुनर्बाधणी करण्यात आली, हे दुर्गा मंदिर प्राचीन काळापासून भक्तांचे तीर्थस्थान आहे. जीन माता मंदिराबाबत आणखी एक मान्यता अशी आहे की ते ९व्या शतकात बांधले गेले होते.

औरंगजेबाने देवीच्या मंदिरात जाऊन मागितली माफी –

जीन मातेला चमत्कारी मंदिर म्हणून ओळखले जाते. याबद्दल एक आख्ययिका अशी की, एके दिवशी औरंगजेबाने हे मंदिर लुटण्यासाठी आणि पाडण्यासाठी आपले सैन्य येथे पाठवले. मंदिरातील पुजाऱ्यांनी हजारो सैन्य पाहून मातेला रक्षणासाठी आवाहन केले, तेव्हा मोठ्या प्रमाणात मधमाश्या औरंगजेबाच्या सेन्यावर तुटून पडल्या हे मातांच्या चमत्कारामुळे घडले. मधमाशांच्या चाव्यामुळे गंभीर जखमी झाल्याने सर्व सैनिक पळून गेले. औरंगजेबाला दुखापत झाली जेव्हा औरंगजेब फार आजरी पडू लागला तेव्हा त्याने देवीच्या दरबारात जाऊन मातेची माफी मागितली. त्यानंतर औरंगजेब पूर्ण बारा झाल्यानंतर त्याने मातेच्या मंदिरात अखंड दिवा लावल्याचेही सांगितले जाते.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे: Aaditya Thackeray

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss