Monday, September 30, 2024

Latest Posts

Navratri 2024 : नवरात्रीच्या नऊ दिवसाचे नऊ रंग, महत्त्व आणि संस्कृती घ्या जाणून

Navratri 2024 : प्रमुख सणांपैकी नवरात्रीला खूप महत्त्व आहे. नवरात्रीचा उत्सव आणि उपवास दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ गुरुवारपासून सुरु होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगाचे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. वर्षामधून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुप्त साजरी केली जाते. तर चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जातात. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हंटले जाते. धार्मिक ग्रंथानुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्री सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. शारदीय नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानले गेले आहेत. नवरात्रीमध्ये भगवती देवीची पूजा केल्याने कुटूंबात, सुख, शांतात नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे.विजयादशमी हा सण भगवान श्रीरामाच्या जन्मापूर्वीपासून साजरा केला जातो. दुर्गा देवींनी महिषासुराशी ९ दिवस युद्ध केल्यानंतर १० व्या दिवशी माता दुर्गाने त्याचा वध केला. माता कात्यायिनी दुर्गाने महिषासुराचा वध केल्यामुळे तेव्हापासून विजयादशमी हा सण साजरा केला जातो,जो श्रीरामाच्या काळापासून प्रचलित आहे. विजयादशमीच्या दिवशी वाहने, आणि शास्त्राची पूजा केली जाते. भगवान ब्रह्मदेवाने भगवान श्रीराम याना दुर्गा देवीचे रूप असलेल्या चंडीदेवीची पूजा करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या सांगण्यावरूनच प्रतिपदा पासून नवमी तिथीपर्यंत चंडी देवीची पूजा श्रीरामाने केली होती. भगवान श्रीरामाने ९ दिवस अन्न आणि पाणी घेतले नाही. श्रीरामाने ९ दिवस दुर्गा मातेचे रूप असलेल्या चंडीदेवीची पूजा केल्यानंतर श्रीरामाने रावणावर विजय मिळवला. तेव्हा पासून नवरात्रोस्तव आणि ९ दिवस उपवास सुरु झाल्याचे मानले जाते. नवरात्रीचे नऊ रंग ३ ऑक्टोबर गुरवार-पिवळा, शुक्रवार-हिरवा, शनिवार-राखाडी, रविवार-नारंगी, सोमवार-पांढरा, मंगळवार-लाल, बुधवार-निळा, गुरुवार-गुलाबी, शुक्रवार-जांभळा, शनिवार-मोरपंखी रंग अश्या या वर्षांमधील नवरात्रीमधील रंग आहेत.

सिंधू संस्कृती सिंधू संस्कृतीतील नागरिकांद्वारे पूजलेल्या देवतांना नंतरच्या वैदिक संस्कृतीत पशुपती आणि रुद्र म्हटले गेले आहे. आणि त्यांनी त्या मातृकाची पूजा केली ते वैदिक संस्कृतीत देवी मातेची प्रारंभिक रूप बनले. वैदिक संस्कृती सिंधू संस्कृती ही वैदिक आर्याची सभ्यता होती. त्याच्या मध्ये अदिती सर्व शक्तिमान देवी आहे जी सर्व प्राणिमात्रांची माता आहे. त्यानंतर या काळामध्ये कात्यायनी,अंबिका,कन्याकुमारी इत्यादी अनेक देवीची नावे आढळून येतात. या काळामध्ये देवीचे महिषासुर मर्दिनी स्वरूपात मोठ्या प्रमाणावर कोरले गेले.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे: Aaditya Thackeray

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss