Sunday, September 29, 2024

Latest Posts

अखेर कास पठार दुर्मिळ फुलांनी बहरले; पर्यटकांची गर्दी वाढली

सर्वांनाच उत्सुकता लागलेल्या कासपुष्प पठाराच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात बरं सुरु झाल्याने संपूर्ण कास पठार या दुर्मिळ फुलांनी बहरून गेले आहे त्यातच सात वर्षांनी एकदाच फुलणारी टोपली कारवी देखील यंदा फुलल्याने पर्यटकांना ही दुर्मीळ फुले आकर्षित करत आहेत त्यामुळे ही दुर्मिळ फुले पाहण्यासाठी कास पठारावर आता सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे आज देखील ही फुले पाहण्यासाठी एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळाले.

या फुलांमध्ये सात वर्षांनी फुलणारी टोपली कारवी, कंदील फुल,मिकी माऊस, जेली फुल,तेरडा,विविध प्रकारचे ऑर्किट,कुमुदिनी तलावातील दुर्मिळ कमळ फुल, यासह अनेक प्रकारची दुर्मिळ फुले सध्या मोठ्या प्रमाणात उमलली असून ही फुले पाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे म्हणूनच अनेक वर्षांपूर्वी एनेस्को या जागतिक संस्थेने देखील कास पुष्प पठाराला जागतिक पुष्प पठार म्हणून घोषित केले आहे.

सध्या ही फुले पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक एका व्यक्तीला दीडशे रुपये इतकी तिकीट कास वन समितीच्या वतीने ठेवण्यात आले आहे तर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करूनच येथे यावे लागत आहे सध्या दररोज हजारो पर्यटक या वारसा स्थळाला भेट देऊन ही दुर्मिळ फुले पाहत आहेत यामध्ये राज्यास परराज्यातील देखील अनेक पर्यटक या ठिकाणी फुले पाहायला आलेले देखील दिसत असून या फुलांचा बहर आता मोठ्या प्रमाणात वाढल्याने पर्यटकांची गरदि देखील वाढू लागली आहे

लोणावळ्यातील पठारावर सुद्धा आला कारवीचा बहर

निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठार हे फुलांसाठी प्रसिद्ध आहे हे तर सर्वांनाच माहितीय. मात्र, आता पुणे जिल्ह्यात देखील एक असंच कास पठार तयार झालंय. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात हे कास पठार आहे, या ठिकाणी आता पर्यटक गर्दी करू लागलेत. मावळ तालुक्यातील लोणावळ्यापासून अगदी तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर टायगर पॉईंटपासून जवळच असलेल्या या पठारावर जांभळ्या फुलांचा बहर आलाय. अगदी सात ते आठ वर्षातून येणारी ही पर्यटकांना भुरळ घालताना दिसत आहे.

कारवी नावाचे हे फुल आणि निसर्गाची ही किमया लोणावळ्यामध्ये उतरल्यामुळे पर्यटकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलीय. साधारणतः २५ ते ३० एकरच्या पठारावर ही फुले आल्यामुळे मावळ तालुक्यासह मुंबई आणि पुण्याचे पर्यटक या ठिकाणी येऊन या फुलांचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे साताऱ्यातील कास पठारावरील फुलांचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या रंगाची फुलं पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात. त्याचप्रमाणे आता लोणावळ्यातील या पठारावर आता नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. लोणावळ्याकडे विकेंडसाठी वळणारे पर्यटकांचे पाय आता या मनमोहक जांभळ्या फुलांसाठीही वळत आहेत.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकांच्या निकालानंतर ठाकरे गटाने विरोधकांना डिवचलं, बाप को हात लगानेसे पहले…

‘मुंबईत हायअलर्ट’? दहशतवादी मोठ्या हल्ल्याची भीती, पोलीस ऍक्शन मोडवर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss