Sunday, September 29, 2024

Latest Posts

पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी: CM Eknath Shinde

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज (रविवार, २९ सप्टेंबर) ऑनलाईन प्रणालीद्वारे पुणे मेट्रो टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन आणि पुणे मेट्रोच्या (Pune Metro) जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथील स्मारकाचे तसेच सोलापूर विमानतळाचे उद्धाटन, बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला अर्पण करण्याचा कार्यक्रम स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

“पुण्याचा चहूबाजूनी विस्तार होत असताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, उद्योग, शैक्षणिक संस्थेचे जाळे वाढत आहेत. याचा वाहतूक व्यवस्थेवर ताण येत असून प्रदूषणातही वाढ होत आहे, त्यामुळे पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी असून याकरीता मेट्रोसारखे प्रकल्प महत्वाचे आहेत, आगामी काळात मेट्रोचे जाळे वाढविणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

उद्योग आणि पायाभूत सुविधेत महाराष्ट्र देशात अग्रेसर

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “राज्याच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने केंद्र शासनाच्या मदतीने विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. आज राज्यात विविध उद्योग येत असून उद्योगाला चालना देण्याकरीता राज्य शासन सहकार्य करीत आहेत. राज्यात ५२ टक्के परदेशी गुंतवणूक झाली आहे, विविध क्षेत्रातील उद्योजक राज्याकडे आकर्षित होऊन उद्योगाला चालना देत आहेत. आपले राज्य उद्योगस्नेही झाले असून उद्योग आणि पायाभूत सुविधेत देशात महाराष्ट्र अग्रेसर झाले आहे.”

पुरंदर विमानतळाकरीता भूसंपादनाची कार्यवाही करा

“पुरंदर विमानतळाकरीता लवकरात लवकर जागा अधिग्रहित करुन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा. याबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरीता केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय आणि उद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करावे, आगामी काळात पुरंदर विमानतळाचे काम सुरु करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येईल. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथील स्मारकाकरीता राज्य शासनाने पुढाकार घेतला असून याठिकाणी ऐतिहासिक स्मारक होत आहे,” असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकांच्या निकालानंतर ठाकरे गटाने विरोधकांना डिवचलं, बाप को हात लगानेसे पहले…

‘मुंबईत हायअलर्ट’? दहशतवादी मोठ्या हल्ल्याची भीती, पोलीस ऍक्शन मोडवर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss