Monday, September 30, 2024

Latest Posts

शिवसेना सोडल्यावर Narayan Rane यांना Uddhav Thackeray यांनी दिली होती जीवे मारण्याची सुपारी, Anand Dighe यांच्या मृत्यूचे सत्यसुद्धा बाहेर येणार: Nitesh Rane

ठाण्यातील दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्यावर आधारित ‘धर्मवीर २’ चित्रपट (Dharmaveer 2) शुक्रवारी (२७ ऑगस्ट) रिलीज झाला. यावरून आधीच मोठा वाद निर्माण होत असून आता चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर यात आणखी भर पडली आहे. यावरून आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या असून शिवसेना (Shivsena) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आनंद दिघे यांच्या मृत्यूवर संशय निर्माण करत शिरसाट यांनी आनंद दिघे यांची हत्या झाली असल्याचे वक्तव्य केले. होते. यावरून आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खळबळजनक विधान केले असून शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

यावेळी माध्यमांशी संवाद साधत नितेश राणे म्हणाले, “धर्मवीर २ हा चित्रपट मी अजूनही पाहिलेला नाही पण लवकरच पाहणार आहे. परंतु जे काही सत्य आहे ते धर्मवीर चित्रपटाच्या माध्यमातून बाहेर आले आहे. वर्षानुवर्षे घाणेरडे राजकारण उद्धव ठाकरे आणि त्यांची टोळी करत होती. त्याचे वस्त्रहरण धर्मवीर २ मध्ये झाले आहे, आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत वर्षानुवर्षे संशय आहे. पण जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा याच उद्धव ठाकरेंनी त्यांना मारून टाकण्याच्या सुपारी दिल्या होत्या. राज ठाकरे यांच्या जीवालाही धोका निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, एकनाथ शिंदे जेव्हा आघाडीत मंत्री होते तेव्हा मुद्दाम त्यांची सुरक्षा कमी करण्याचा प्रयत्न केला होता. आनंद दिघे मोठे होणे हे कोणाला आवडत नव्हतं, या पूर्ण प्रवासामध्ये एकाच माणसावर संशयाची सुई आहे कधी ना कधी सत्य बाहेर आली पाहिजे. विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती कोणामध्ये आहे समजणाऱ्याला इशारा पुरेसा आहे. पहिल्या पिक्चरच्या क्लायमॅक्सच्या वेळी उद्धव ठाकरे का उठून गेले हे विचारा,” असे ते म्हणाले.

नितेश राणे सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. भाजप नेते नितेश राणे यांच अचलपूर येथील हिंदू आक्रोश मोटारसायकल रॅली पार पडली. रॅली झाल्यानंतर अचलपूर येथे धर्मसभा झाली. शेकडो मोटारसायकल घेऊन सकल हिंदू समाज उपस्थित राहिला होता. जोरदार घोषणाबाजीकरत भगवे झेंडे घेऊन युवक सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. नितेश राणे यांच्या दौऱ्याला मुस्लिम संघटनाचा विरोध असल्याचे चित्र दिसून आले. १,५०० पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त यावेळी लावण्यात आला होता.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकांच्या निकालानंतर ठाकरे गटाने विरोधकांना डिवचलं, बाप को हात लगानेसे पहले…

‘मुंबईत हायअलर्ट’? दहशतवादी मोठ्या हल्ल्याची भीती, पोलीस ऍक्शन मोडवर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss