Tuesday, October 1, 2024

Latest Posts

Navratri 2024 : महाराष्ट्रातील देवी मातेची सर्वोच्च मंदिरांबाबत तुम्हाला माहित आहे का ?

भारतामधील प्रमुख सणांपैकी नवरात्रीला खूप महत्त्व आहे. नवरात्रीचा उत्सव आणि उपवास दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ गुरुवारपासून सुरु होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगाचे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये अनेक जण नऊ दिवस देवी दुर्गाची उपासना करतात देवी मातेची मनोभावाने पूजा करतात . नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हंटले जाते. तर आपण जाऊन घेऊया महाराष्ट्रामधील देवीमातेचे सर्वाच्च मंदिरे आणि त्यांची नावे

कोल्हापूरची श्री महालक्ष्मी
महाराष्ट्रामधील कोल्हापूरमधले प्रसिद्ध असलेले श्री महालक्ष्मी मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे. कोल्हापूरची अंबाबाई म्हणून ओळखली जाणारी श्री महालक्ष्मी ही भक्तांच्या हाकेला धावणारी आहे. तसेच कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अवघ्या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहे. अंबाबाईचा उल्लेख पुराणात देखील सापडतो. तसेच महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मुख्य शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची श्री अंबाबाई आहे. अंबाबाईच्या मंदिराला पाच कळस आहे, हे मंदिर हेमांडपंथी शैलीत बांधण्यात आले आहे. असे सांगण्यात आले की श्री महालक्ष्मीची मूर्ती रत्नजडित खड्यांपासून घडविण्यात आले आहे.

तुळजापूरची श्री तुळजाभवानी
महाराष्ट्रामधील तुळजापूरमधील असलेले तुळजाभवानी ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ मानले जाते. तुळजापूरमाधील तुळजाभवानी तीर्थक्षेत्र हे पूर्ण आणि आद्यपीठ मानले जाते. आपल्या स्वराज्य हिंदवीचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवी देखील श्री तुळजाभवानी आहे. पुराणानुसार दैत्य असुरांचा संहारकरून धर्माचरण आणि नीतीची पुनर्स्थापना करण्याचे कार्य तुळजाभवानी देवी आईने केले. महारष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये तुळजाभवानी देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो आणि भाविक भक्तांची गर्दी असते.

माहूरगडची श्री रेणुका देवी
महाराष्ट्रातील माहूरगड मध्ये असलेली रेणुका देवी ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ असून जागृत देवस्थान आहे. शारदीय नवरात्रीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते रेणुका माता ही अनेक जणांची कुळदैवता आहे तसेच आई एकविरा आणि एकविरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो. दैवत्व एक असलेले तरी या दोन्ही देवीची नावे व स्थान वेगवेगळे आहे.

वणीची श्री सप्तशृंगी
महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी एक प्रमुख असलेले अर्ध शक्तीपीठ म्हणजे वणीची श्री सप्तशृंगी होय. महाराष्ट्रातील नाशिकजवळ असलेले वणी हे सप्तशृंगी देवीची निवासस्थान आहे.हे अतिशय जागृत देवस्थान म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

Latest Posts

Don't Miss