Tuesday, October 1, 2024

Latest Posts

न लाटण्याची टेंशन ना कणिक मळण्याची झंझट बघा, आलू पराठा झटपट रेसिपी…

तुमच्या मुलांना डब्याला किंवा ऑफिसच्या डब्यासाठी अश्या झटपट प्रकारे बनवा बटाटा पराठा,लहान मुलांना बटाटा पराठा फार आवडतो. पण अनेक महिलांना बटाटा पराठा चांगल्या पद्धतीने बनवता येत नाही,कधी पराठ्यामध्ये सारण भरता येत नाही तर कधी पराठा नीट लाटता येत नाही. किंवा सकाळी मुलांच्या शाळेत लंचबॉक्समध्ये देण्याची घाई असते. याला तुम्ही बटाट्यापासून बनवलेला चीला असेही म्हणू शकता. पण काही महिलांना पराठा योग्य पद्धतीने न बनवता आल्यामुळे सोप्या पद्धतीने बनवलेला पराठा संगळ्यांनाच आवडेल. चला तर झटपट आलू पराठयांची रेसिपि पाहू…

बटाटा पराठा बनवण्यासाठी साहित्य-

दोन उकडलेले बटाटे
आर्धा चमचा हळद पावडर
एक छोटा चमचा लाल तिखट
मीठ चवीनुसार
एक चमचा धना पावडर
चिरलेली हिरवी मिर्ची
एक छोटा चमचा पांढरे तीळ
एक छोटा चमचा चाट मसाला
एक छोटा चमचागरम मसाला
एक बारीक चिरलेला कांदा

बटाटा पराठा बनवण्याची कृती –

बटाटा पराठा बनवण्यासाठी प्रथम एका भांडयात गव्हाचे पीठ घ्या. या गव्हाच्या पिठामध्ये हळद,धना पावडर,पांढरे तीळ, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ हे सर्व मसाले घाला. आता त्यामध्ये पाणी घालून जाड पीठ तयार करा आणि पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाही याची काळजी घ्या. आता बटाटा चांगला मॅश करून मळून घ्या त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला,बारीक चिरलेली मिर्ची घाला. हे सर्व मिश्रण सर्व एकत्र करा हे लक्षात ठेवा कि हे मिश्रण जास्त पातळ होणार नाही. कढईत तूप किंवा लोणी घालावे. त्यावर पीठ पसरवून हाताने तेल लावावे. त्यावर झाकण ठेऊन मंद आचेवर एका बाजूने शिजवावे आणि नंतर ते दुसऱ्या बाजूने शिजवावे. दोन्ही बाजूनी चांगलं भाजून घ्या. अश्या प्रकारे झटपट तयार आहे बटाटाचा पराठा.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे: Aaditya Thackeray

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss