Tuesday, October 1, 2024

Latest Posts

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची CM Eknath Shinde यांच्याकडून गंभीर दखल, डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश

मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात (Nair Hospital and Medical College) शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीवर लैगिक छळ घडल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापकानेच हे कृत्य केल्याचे तपासात पुढे आले होते. यावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश देत पीडितांना न्याय मिळूवुन देण्याची खात्री त्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत त्यांनी आज आज (मंगळवार, १ ऑकटोबर) माध्यमांशी संवाद साधत या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, याप्रकरणी विशेष चौकशी समिती नेमून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे.

डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश

मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू. रुग्णालयातील सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे.”

नायर रुग्णालयाचे डीन डॉ. सुधीर मेढेकर यांची बदली

नायर रुग्णबाळयातील लैगिक छळवणूक प्रकरणात विशेष चौकशी स्थापन करण्यात आली असून नायर रुग्णालयाचे डीन डॉ. सुधीर मेढेकर यांची नायर रुग्णालयातून बदली करण्यात आली आहे. आता कूपर रुग्णालयात त्यांची बदली करण्यात आली असून तिथे ते डीन म्हणून काम पाहतील. तर कूपर रुग्णालयाचे डीन डॉ. शैलेश मोहिते यांना नायर रुग्णालयाचे डीन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

व्होट जिहादमुळे लोकसभेत पराभव, Devendra Fadnavis यांचा मोठा दावा

Devendra Fadnavis यांनी ‘व्होट जिहाद’ हा शब्द वापरणे म्हणजे संविधानाचा अपमान; Congress नेत्याचा जोरदार हल्लाबोल

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss