Tuesday, October 1, 2024

Latest Posts

काय सारखं जिहाद जिहाद करताय? तुमचा भ्रष्टाचाऱ्यांशी निकाह लागलाय; Sanjay Raut यांचा Devendra Fadnavis यांना टोला

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राज्यात आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे राज्यभरात ठिकठिकाणी दौरे, सभा, बैठका आणि यात्रा पार पाडल्या जात आहेत. अश्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सभा काल (सोमवार ३० सप्टेंबर) कोल्हापूर येथे पार पडली. यावेळी उपस्थितांसमोर भाषण करताना फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात व्होट जिहाद झाल्याचा खळबळजनक दावा केला असून आता यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. राजकीय नेत्यांच्या यावरून प्रतिक्रिया येऊ लागल्या असून यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. अश्यातच आता शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘लोकसभा निवडणुकीत ४८ मतदारसंघांपैकी १४ मत्तदारसंघ आहेत. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्होट जिहाद झाला असल्याचा गंभीर दावा फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात मिळालेल्या अपयशाच्या मुख्य कारणांपैकी एक म्हणजे मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात केलेले मतदान. यावरून आता देवेंद्र फडणवीसांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी पावले उचलल्याचे स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडीला मिळालेल्या मुस्लिम मतदानावरून टीका करत ‘व्होट जिहाद’ झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी आज (मंगळवार, १ ऑकटोबर) माध्यमांशी संवाद साधत यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “व्होट जिहाद काय असतो ते विचारा एकदा त्यांना.. त्यांच्याशी तोंडात सध्या जिहाद खूप येतोय. ते दुसरीकडे कुठे तलाख देत आहेत का? कि निकाह करत आहेत कोणाशी? मतांसाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाशी ते निकाह करत आहेत का विचारा त्यांना… हे काय सारखं जिहाद, जिहाद करत आहेत, आधी जिहादचा अर्थ समजून घ्या मग बोला. तुम्हा भ्रष्ट लोकांची मत चालतात, तुमचा भ्रष्टाचारांशी निकाह लावला असं बोलू का? ७० हजार कोटींचे घोटाळे, एकनाथ शिंदे यांचे घोटाळे, चाळीस आमदारांचे घोटाळे या सगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही आपल्याबरोबर घेतलं, मग तुम्ही त्यांच्याशी निकाह लावला सांगू का?” असा घणाघाती सवाल त्यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ?

कोल्हापूर येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना फडणवीस म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद पाहायला मिळाले. धुळे लोकसभेच्या सहापैकी पाच मतदारसंघात आघाडीवर असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य मतदारसंघात १ लाख ९४ हजार मतांनी मागे जातो आणि त्याचा चार हजार मतांनी पराभव होतो. निवडणुकीत हर जीत महत्वाची नाही… कधी हा पक्ष जिंकेल तर कधी तो पक्ष जिंकेल… मात्र, संघटित मतदान करून हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो, असा काही लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो आहे. लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद झाला असून २८ पैकी १४ मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

PM Narendra Modi, Amit Shah यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा फायदा महाविकास आघाडीलाच: Nana Patole

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss