Wednesday, October 2, 2024

Latest Posts

Pune Helicopter Crash: बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा मृत्यू; दाट धुक्यांमुळे झाला भीषण अपघात

पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज सकाळी (बुधवार, २ ऑकटोबर) एक हेलिकॉप्टर कोसळ्याची घटना (Helicoptar Crash in Pune) घडली असून दुर्दैवाने या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेलया माहितीनुसार, सकाळी पावणेसातच्या दरम्यान हि दुर्घटना झाल्याचे समजते. अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह एक इंजिनिअर होता. हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. उड्डाणानंतर काहीवेळातच हे हेलिकॉप्टर दरीत कोसळले. यात तिघानाचा दुर्दैवी अंत झाला आहे. हा परिसर मुंबई – बंगळुरू महामार्गापासून काही अंतरावर असून हा अपघात नेमका कसा घडला याची माहिती अजून समोर आलेली नाही.

या परिसरात एका टेकडीवर ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमधील हेलीपॅडवरून आज सकाळी या हेलिकॉप्टरने उड्डाण केले. मात्र, या डोग्राला भागात दाट धुके पसरल्याने हि दुर्घटना घडल्याचे समजते. अपघात झाल्यानंतर लगेच हेलिकॉप्टरने पेट घेतला. यामुळे आत बसलेल्याअ तिघांचाही जागीच मृत्यू झाला. बावधन बुद्रुकमधील, ऑक्सफर्ड काऊंटी परिसरातील दरीत हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात आहे.

या अपघाताची माहिती हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रूमला मिळाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, पोलीस आणि इतर यंत्रणा बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या. मात्र या दुर्दैवी अपघातात तिघांचा मृत्यू झाला. येथील रिसॉर्टमध्ये अनेक उच्चभ्रू व्यक्ती पर्यटनासाठी येत असतात. त्यांना पुण्यातून थेट रिसॉर्टमध्ये येण्यासाठी हेलिपॅड उभारण्यात आले आहे. मुळशीपासून हे रिसॉर्ट काही अंतरावर आहे. हेलिकॉप्टरने उद्धण केल्यानंतर अवघ्या तीन मिनिटातच हे हेलिकॉप्टर कोसल्याचे समजते. या भागात धुक्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळे हा अपघात झालयाचे बोलले जात आहे.

हे ही वाचा:

PM Narendra Modi, Amit Shah यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा फायदा महाविकास आघाडीलाच: Nana Patole

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss