Wednesday, October 2, 2024

Latest Posts

‘अमित शहांना स्वप्नदोष झालाय,’ Amit Shah यांच्या वक्तव्यावर Sanjay Raut यांचा टोला

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राज्यात आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे राज्यभरात ठिकठिकाणी दौरे, सभा, बैठका आणि यात्रा पार पाडल्या जात आहेत. अश्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल (मंगळवार, १ ऑकटोबर) अमित शाह यांनी मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात ‘२०२९ साली भाजप राज्यात स्वबळावर सत्ता आणेल,’ असे वक्तव्य केले होते. यावरून आता शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

गृहमंत्री अमित शाह कालपासून मुंबई, नवी मुंबई दौऱ्यावर आहेत. काल मुंबईत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना “आगामी निवडणुकीत महायुतीचे सरकार सत्तेवर येईल, हे निश्चित असून २०२९ मध्ये भाजपाचे स्वबळावर सरकार आणण्यासाठी जोमाने काम करावे,” असे वक्तव्य केले होते. यावरून संजय राऊत यांनी आज (बुधवार, २ ऑकटोबर) माध्यमांशी संवाद साधत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “अमित शहांना स्वप्नदोष झालेला आहे. २०२४ ला पूर्णपणे सरकार आणू शकले नाही. त्यामुळे संपूर्ण भाजपला स्वप्नदोष याचा विकार झालेला आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “अमित शहांना स्वप्नदोष झालेला आहे. २०२४ ला पूर्णपणे सरकार आणू शकले नाही, त्यामुळे संपूर्ण भाजपला स्वप्नदोष याचा विकार झालेला आहे. अमित शहा संपूर्ण देशाचे गृहमंत्री आहे आणि ते गल्लोगल्ली महाराष्ट्रात फिरत आहेत. हे त्यांना शोभत नाही, त्यांनी राष्ट्राचा विचार करावा. २०२९ मध्ये आपली सरकार राहणार की नाही याचा त्यांनी विचार करावा. नरेंद्र मोदींना त्यांच्या नियमानुसार रिटायर व्हायला लागणार. ७५ वर्षा नुसार निवृत्त व्हायला लागणार. २०२४ ला तुम्ही २४० ला थांबलेले आहात २०२९ ला आपण १४० च्या खाली थांबाल. स्वप्न पाहणाऱ्यांवर इडी सीबीआय रेड टाकू शकत नाही ना… या देशातून भारतीय जनता पक्षाचे अधपदन सुरू झालेला आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “कार्यकर्ते फोडण्याबाबत वारंवार ते बोलत आहेत. याचा अर्थ भारतीय जनता पक्ष जमिनीवरून पूर्णपणे नष्ट झालेला आहे. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीयेत. त्यांच्याकडे मतदार नाही आहेत. त्यांच्याकडे फक्त बाहेरून चोरलेले नेते आहेत. फक्त गद्दार आणि गद्दारांकडे मतदार आणि कार्यकर्ते नाहीत. हे अमित शहांना फार लवकर कळालेले आहे. आमच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत, आमच्याकडे ईडी सीबीआय आहे, पैसे आहेत, हे देशाच्या गृहमंत्र्यांनी कबूल केलं हे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे,” असे ते म्हणाले.

पुढे पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर टीका करत ते म्हणाले, “खरं म्हणजे या दोघांपासून महाराष्ट्राला धोका आहे. नरेंद्र मोदी व अमित शहा पासून महाराष्ट्राला धोका आहे. गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्राची लूट होत आहे. यांना महाराष्ट्र खतम करायचा आहे. मराठी माणूस खतम करायचा आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान खोडून काढायचा आहे या दोघांना. महाराष्ट्राचा उरला सूरलेला स्वाभिमान मोडून काढायचा आहे. खतम करून महाराष्ट्राला गुजरातला जोडायचे आहे म्हणून हे वारंवार महाराष्ट्रात येत आहे. महाराष्ट्राची इंच इंच जमीन महाराष्ट्राच्या संस्था उद्योग अदानीच्या घशात घातली जात आहे ही संपत्ती जरी अदानीच्या नावावर असली तरी या दौलतीचे मालक नरेंद्र मोदी आणि शहा आहेत. महाराष्ट्राला या दोघांपासून धोका आहे. हा धोका दूर करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र आहेत.”

हे ही वाचा:

अमित शाहांचे मिशन मुंबई, दोन दिवसीय दौऱ्यात मुंबईतील विधानसभा मतदारसंघांचा घेणार आढावा

अदानीच्या प्रकल्पासाठी संपूर्ण प्रशासन दावणीला – काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss