Wednesday, October 2, 2024

Latest Posts

Shardiya Navratri 2024:साडेतीन शक्तीपीठांपैकी अठराभुजा देवीची कथा…जाणून घ्या सविस्तर

नाशिक जिल्ह्यातील वणीतले हे रमणीय ठिकाण. समुद्रसपाटीपासून गडाची ४५६९ फूट उंची आहे. या गडाला एकूण ४७२ पायऱ्या आहेत. गड चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी दोन्ही वेगवेगळे मार्ग आहेत.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या ठिकाणी सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेलं हे ठिकाण. सह्याद्रीच्या कड्याला सात शिखरे आहेत. त्यावरून या गडाला सप्तशृंगी असे म्हंटले जाते. गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, तांबुलतीर्थ, मार्कंडेय ऋषींचा मठ, शितकडा, शिवतीर्थ अशी पवित्र स्थळे आहेत. नाशिक जिल्ह्यातील वणीतले हे रमणीय ठिकाण. समुद्रसपाटीपासून गडाची ४५६९ फूट उंची आहे. या गडाला एकूण ४७२ पायऱ्या आहेत. गड चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी दोन्ही वेगवेगळे मार्ग आहेत.

सप्तशृंगी देवीची मूर्ती स्वयंभू असून ती आठ फूट उंच आहे. तिला अठराभुजा आहेत. मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत. महिषासुराच्या वधासाठी ब्रम्हा, विष्णू, महेश आणि इंद्राने आपापली आयुधे देवीला दिल्याचं म्हटले जाते. मंदिराच्या गाभाऱ्याला तीन दरवाजे आहेत. शक्तीद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार. या दरवाजातून मातेचे दर्शन होते. काही ठिकाणी असं म्हटलं जातं की, चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न असते तर शारदीय नवरात्रात गंभीर.

देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते. एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यावर तेथे देवीची मूर्ती सापडली अशीही एक दंतकथा आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूरअर्चित असून रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती असे म्हटले जाते. सप्तशृंगी गडावर महिषासुराचे एक मंदिर आहे. येथे देवीने त्रिशुळाने महिषासुराच्या धडापासून शीर वेगळे केले. त्यामुळे पर्वताला मोठी भेग पडली. या ठिकाणी महिषासुराच्या शीराचे पूजनही केले जाते. असंही म्हटलं जातं की, राम आणि रावणाचे युद्ध झाले त्यावेळी इंद्रजितच्या शस्त्रामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडला. अशावेळी लक्ष्मणला शुद्धीवर आणण्यासाठी मारुतीने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्याचा काही भाग जमिनीवर पडला. तो म्हणजे सप्तशृंगी गड, असे म्हंटले जाते.

नवरात्रोत्सवात दरवर्षी सप्तशृंगी गडावर मोठी यात्रा भरते. राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येथे येतात. गड परिसरातील वातावरण निसर्गयरम्य आहे. त्यामुळे येथे कुणालाही इथल्या स्थळाची भुरळ पडते. लाखो भाविकांचे सप्तशृंगी माता कुलदैवत आहे. या ऐतिहासिक आणि धार्मिक गडावर तुम्ही पोहोचलात की मन प्रसन्न होऊन जाते. तर तुम्हीही यंदाच्या नवरात्रीमध्ये सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जाऊ शकता.

हे ही वाचा:

‘येक नंबर’ च्या टायटल साँग मध्ये पाहायला मिळणार मलायका अरोराचा जलवा तर सिद्धार्थ जाधव दिसणार अनोख्या अंदाजात…

Shardiya Navratri 2024: नवरात्री का साजरी केली जाते? काय त्याचे महत्त्व? जाणून घ्या सविस्तर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss