Wednesday, October 2, 2024

Latest Posts

धुळ्यात ठाकरे गट आक्रमक, मनपाच्या सत्ताधारी भाजपच्या विरोधात सर्वपित्री अमावस्येला घातले श्राद्ध

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राज्यभरात सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक दरोरोजच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) महायुती सरकारवर (Mahayuti Government) चालेल्या कारभारावरून दररोजच टीका टिपण्णी होत असते. महायुतीचे नेतेही त्यावर प्रत्युत्तर देत असतात. राज्यात सरकारविरोधात आक्रमक होत मविआकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलनसत्र चालू आहेच अश्यातच आज (बुधवार, २ ऑकटोबर) धुळ्यात शिवसेना ठाकरे गट (Shivsena UBT) महानगर पालिकेच्या सत्ताधारी भाजपच्या (BJP) विरोधात आक्रमक होत सर्वपित्री अमावस्येनिमित्त श्राद्ध घालत आंदोलन केले आहे.

आज सर्वपित्री अमावस्येचा दिवस साजरा होत असून सर्वत्र पितरांना श्राद्ध घालण्याची प्रथा पाळली जाते मात्र दुसरीकडे धुळ्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाने अनोख्या पद्धतीने धुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात आक्रमक होत महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच श्राद्ध घातले असून, गेल्या पाच वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येऊन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत यावेळी ठाकरे गटाच्या वतीने सत्ताधारी भाजपचे श्राद्ध घालत यावेळी ठाकरे गटाने निषेध नोंदविला.

हिंदू धर्म संस्कृतीत सर्वपित्री अमावस्येला पितरांचे श्राद्ध घातले जाते या दिवशी पितरांना पारंपारिक पद्धतीनुसार नैवेद्य दाखवला जातो मात्र धुळ्यात दुसरीकडे ठाकरे गटाने आक्रमक होत महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच सत्ताधारी भाजपचे श्राद्ध घालत विधिवत पूजा करून नैवेद्य दाखविला दरम्यान ठाकरे गटाच्या या आंदोलनाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. गेल्या पाच वर्षात सत्ताधारी भाजपाने महापालिकेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नागरिकांना पुरवलेल्या नाहीत तसेच जनतेचा पैसा सत्ताधारी भाजपने हडप केल्याचा देखील आरोप करत ठाकरे गटाने यावेळी पारंपारिक पद्धतीने श्राद्धविधी करत सत्ताधारी भाजपचा निषेध नोंदविला.

हे ही वाचा:

BJP ने लढण्याआधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत MVA चे सरकार येणार: Nana Patole

‘तीन नंबरचा गाळ’ शेतकऱ्याच्या मुलाला भेटते; आमदार Devendra Bhuyar यांचे महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss