Wednesday, October 2, 2024

Latest Posts

वाडिया महाविद्यालय अत्याचार प्रकरणी पिडीतेच्या वकिलांचा गंभीर आरोप, एन्काऊंटर केल्याने अशी प्रकरण कमी होणार नाहीत

काही दिवसांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध वाडिया कॉलेजमधील एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून चार जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. कोरेगाव पार्क पोलिसांकडून या प्रकरणी पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आता पिढीतेच्या वकिलांनी माध्यमांसमोर काय येऊन काही आरोप केले आहेत.

या प्रकरणातील वकील ऍडव्होकेट निवृत्ति चापके यांनी आज (बुधवार, २ ऑकटोबर) माध्यामांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “अतिशय घृणास्पद घटना घडली असून महाविद्यालयाने घटना लपवून ठेवल्या. यामधील अनेक प्रसंग लपवण्यासाठी प्रयत्न झाला. पोलिसांनी गुन्हा नोंद केला, पण त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करायला पाहिजे होती ती केली. ६ ते २३ सप्टेंबर दरम्यान अनेक घटना घडल्या, व्हिडीओ वायरल झाले, गुन्हेगार अनेक होते, का कारवाई झाली नाही?” असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

“महाविद्यालयापर्यंत हा सगळा प्रकार गेल्यानंतरही परत एकदा त्या मुलीवर अत्याचार झाला, मात्र हे प्रकरण त्या ठिकाणीच दाबण्याचा प्रयत्न केला गेला. आता पोलिसांनी न्याय देण्यासाठी प्रयत्न करू अस सागितले आहे. पोलिसांनी त्यांचं काम करावे, निर्भीडपणे काम करावं संथगतीने तपास होत आहे. चार आरोपी पैकी दोन आरोपींचे पालक सरकारी नोकर असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे तपास संथगतीने होतोय का अस वाटत. जर ६ सप्टेंबर पासून महाविद्यालयात व्हिडिओ व्हायरल होतं ते तर महाविद्यालयाने दखल का घेतली नाही? असा आमचा आरोप आहे.”

“हा सामुदायिक बलात्काराचाच प्रकार आहे. त्यामुळे आज आई वडील माध्यमांसमोर येणार होते मात्र पोलिसांनी त्यांना स्टेटमेंट नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर तपासून कारवाई व्हावी,” असे ते म्हणाले.

स्त्री मुक्ती समितीच्या ऍडव्होकेट अर्चना मोरे यावेळी म्हणाल्या, “दुर्दैव आहे कि पिढीतेच्या आई-वडिलांना माध्यमांसमोर येऊन बोलावं लागत आहे. ती आज होणार होतं मात्र झालं नाही. एन्काऊंटर करणाऱ्याचा उदो उदो केलं जातय. एन्काऊंटर केल्याने अशी प्रकरण कमी होत नाहीत. स्त्रियांवरती होणाऱ्या अत्याचाराबाबत शासनाने डोळ्यात तेल घालून काम केलं पाहिजे, तातडीने तक्रार करून त्याबाबत चौकशी करणे न्यायालयासमोर नेण हे सरकारने केलं पाहिजे. आपल्याकडे अनेक चांगले कायदे आले आहे,मात्र कायद्याची अंमलबजावणी होत नाही. शैक्षणिक संस्थेवर शिक्षण विभागाने कारवाई करायला पाहिजे. यामध्ये पालकांवर दबाव आणला जातोय. या सर्वोच्च न्यायालयाचे चौकशी झाली पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

BJP ने लढण्याआधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत MVA चे सरकार येणार: Nana Patole

‘तीन नंबरचा गाळ’ शेतकऱ्याच्या मुलाला भेटते; आमदार Devendra Bhuyar यांचे महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss