spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हेमंत ढोमे नी उध्दव ठाकरेंचे मानले आभार

सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी देखील प्रतिक्रिया दिल्या.अभिनेता हेमंत ढोमे यानं देखील एक ट्वीट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले. काल रात्री (बुधवारी) फेसबुक लाईव्हवरुन जनतेशी संवाद साधून राजीनाम्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या जात आहेत. सामान्य नागरिकांनी देखील त्याचं मत मांडलं. अनेक भावुक पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी देखील प्रतिक्रिया दिल्या.अभिनेता हेमंत ढोमे यानं देखील एक ट्वीट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेता हेमंत ढोमे यानेही ट्विट करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ‘Thank you उद्धव ठाकरे. तुमचा संपुर्ण प्रवास सहजसुंदर आणि निर्मळ होता… कोरोनाकाळात आपण कुटुंबप्रमुख म्हणुन आमची काळजी घेतली… आज आपल्याला मुख्यमंत्री म्हणुन अलविदा म्हणताना खरच वाईट वाटतंय… धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब! तुम्ही कायम लक्षात राहणार!’ असे हेमंत ढोमे म्हणाला. हेमंत अनेकदा सामाजिक – राजकीय परिस्थितीवर कधी उपरोधात्मक तर कधी व्यंगात्मक तर कधी थेट शब्दांत मतं व्यक्त करत असतो. राज्यातील राजकीय अस्थिर अशा वातावरणावरही हेमंतनं अत्यंत मार्मिक शब्दांत ट्वीट केलं होतं

दिवसांपूर्वीच त्याने बंडखोर आमदारांवर एक खोचक टीका केली होती. ‘आम्ही असं बंड केलं की आमची आई कलथ्याने चटका द्यायची..’ असे ट्विट त्याने केले होते. त्यानंतर थेट कालच्या राजकीय गोंधळावर तो बोलला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सारख्या शांत आणि संयमी माणूस त्या पदावरून बाजूला झालेला कलाकारांना आवडलेल नाही. प्रत्येकजन या संदर्भात व्यक्त होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत आहेत.

Latest Posts

Don't Miss