spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Navratri 2022 : नवरात्रीचा उपवास करताय ? तर हि बातमी तुमच्यासाठी खास…

नवरात्र सणाची धूम वेगळीच असते. काही लोकं यात भरपूर खातात तर काही नऊ दिवस उपवास करतात. या नऊ दिवसाच्या काळात दांडिया-गरब्याचं सेलिब्रेशन, घटाची पूजा, व्रतवैकल्य आणि उपवास यात समतोल राखणे आवश्यक असतो.

नवरात्र सणाची धूम वेगळीच असते. काही लोकं यात भरपूर खातात तर काही नऊ दिवस उपवास करतात. या नऊ दिवसाच्या काळात दांडिया-गरब्याचं सेलिब्रेशन, घटाची पूजा, व्रतवैकल्य आणि उपवास यात समतोल राखणे आवश्यक असतो. नाहीतर तब्येतीवर उलटा परिणाम होतो. हा काळ ऋतुबदलाचा मानला जातो. त्यामुळे या दिवसात शरीराची प्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती कमी होते. याच कारणामुळे या काळात उपवासाची पद्धत आहे. तसेच बरेच जण याकाळात भक्ती आणि वजन कमी करणे असा दुहेरी योग साधण्याचा प्रयत्न करतात. पण एकतर पोटाला अती ताण दिला जातो, नाहीतर उपासाच्या पदार्थांच्या सेवनाने पोट खराब होते. यात समतोल राखण्यासाठी डायटिशीयनच्या सल्ल्याने संपूर्ण डाएट प्लॅनही घेतात. या नऊ दिवसांतला आहार शरीरासाठी योग्य ठरल्यास, तोच प्लॅन वर्षभर पाळणं शक्य होतं. तरीही या काळात पूर्णपणे उपाशी न राहता आरोग्यदायी पदार्थ खाणं गरजेचं आहे. म्हणूनच सादर आहे काही टिप्स :

नवरात्रीमध्ये उपवासाच्या निमित्तानं वजन कमी करण्याचा उद्देश असेल, तर आपल्या शरीरप्रकृतीचा विचार करून आहार घ्यावा.

योग्य पदार्थ आणि व्यायाम यांचा समतोल राखल्यास नऊ दिवसांमध्ये दोन ते तीन किलो वजन कमी होऊ शकतं.

वजन कमी करण्याचं न झेपणारं ध्येय ठेवू नका.

फळं, ज्यूस, उपवासाला चालणाऱ्या भाज्या यांचं सेवन करा. आणि भरपूर पाणी प्या.

बराच वेळ उपाशी राहिल्याने अँसिडिटीचा त्रास होऊ शकतो. म्हणून पूर्णवेळ उपाशी राहू नये. थोड्या थोड्या वेळाने सुका मेवा खावा. याने दमल्यासारखं वाटणार नाही.

पाणी, फळांचा ज्यूस, लिंबू पाणी, कोकम सरबतं, नारळांचं पाणी व इतर द्रव पदार्थ भरपूर मात्रेत घ्या.

आवश्यक पोषक घटकांपासून शरीराला वंचित ठेवू नका. उपवासात काळं मीठ खाणं योग्य असतं. या मिठात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असल्याने पचनक्रिया सुधारून पोटात वायू धरत नाही.

साबुदाणा ऊर्जादायक पदार्थ आहे म्हणून त्यात बटाटा, दुधी किंवा उपवासाला चालणार्‍या इतर भाज्या घालून पॅटिस करू शकता. तळण्याऐवजी पॅटिस शॅलो फ्राय करू शकता.

राजगिर्‍याचं पीठ दुधासोबत खाणे योग्य राहील. राजगिर्‍यातून प्रथिनं मिळतात.

शिंगाड्याच्या पिठाने पचनक्रिया सुधारते. याने रक्तामधील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं.

भगर जीवनसत्त्वांचा उत्तम स्रोत आहे. पचण्यास अत्यंत हलका असून याची चव तांदळाप्रमाणे असते. भगर आमटीसोबत खाता येते.

उपवास करत नसला तरी या वेळी उष्ण पदार्थ टाळा. जसे जेवणात कांदा-लसूण आणि इतर उग्र पदार्थ सामील करणे टाळा. त्याऐवजी ताक, दही, फळं, दूध हे भरपूर मात्रेत खा.

 

हे ही वाचा:

Navratri 2022 : काय आहे नवरात्रातील अखंड ज्योतचं महत्व ? घ्या जाणून

Navratri 2022 : नवरात्र हा सण का साजरा केला जातो ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss