spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर येथे दाखल, आजपासून सलग पाच दिवसांचा ‘मिशन विदर्भ’ दौरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) पुढचे पाच दिवस म्हणजेच २२ सप्टेंबर २०२२ पर्यंत विदर्भात(Vidarbha) असणार आहेत. या काळात ते केवळ नागपूरच नव्हे तर विदर्भातील इतरही विविध जिल्ह्यांना भेट देणार आहेत. या पाच दिवसांच्या दौऱ्यात ते अनेक पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. काही लोकांचे पक्षप्रवेशही पार पडतील असे सांगितले जात आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा म्हणून उल्लेख केला जातो आहे.

हेही वाचा : 

Dasara Melava : शिंदे गटाचा अर्ज मुंबई मनपाने स्विकारला, आता शिवसेने काय ?

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून त्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या हाडाच्या ऑपरेशननंतर हा त्यांचा पहिलाच विदर्भ दौरा आहे. मुंबईतल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर त्यांना निरोप देण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे.

राशी भविष्य १८ सप्टेंबर २०२२, मीन राशीच्या लोकांच्या अधिकारात वाढ होईल

या दौऱ्यात पक्षबांधणीच्या उद्देशाने राज ठाकरे पदाधीकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. पक्षस्थापनेपासून सुरुवातीचे काही यश वगळता मनसेला नेहमीच अपयशाचा सामना करावा लागला आहे. त्यातच पाठिमागील काही वर्षांमध्ये पक्षाचे अनेक महत्त्वाचे शिलेदार पक्ष सोडून गेले आहेत. अशा स्थितीत राज ठाकरे यांना पक्ष पुन्हा सावरण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अलिकडील काळात त्यांनी त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु केल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर विदर्भ दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत अविनाश अभ्यंकर, सचिन मोरे, हर्षल देशपांडे, संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव हेसुद्धा उपस्थित असणार आहेत.

अशी करा घरच्या घरी चमचमीत खमंग भोपळ्याची भाजी

Latest Posts

Don't Miss