spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Navratri 2022 : दुर्गा मातेने अप्सरचे रूप धारण करून, केला महिषासुराचा वध

हिंदू धर्मात नवरात्री हा सण मोठ्या थाटामाटात केला जातो.

हिंदू धर्मात नवरात्री हा सण मोठ्या थाटामाटात केला जातो. तसेच नवरात्री मध्ये ९ रूपांच्या देवीची पूजा केली जाते. आणि तिला नऊ दिवस वेगवेगळा प्रसाद दाखवला जातो. नवरात्री मध्ये घटस्थापने समोर अखंड दिवा लावल्यास घरात सुख शांती राहते. तसेच नऊ दिवस देवी समोर गरबा केला जातो. तर काहीजण जागरण गोंधळ करतात. नवरात्री मध्ये काहीजण निर्जय उपवास करतात. तर चला आज जाणून घेऊया दुर्गा मातेने का महिषासुराचे वर्त केले.

हे ही वाचा : Navratri 2022 : काय आहे नवरात्रातील अखंड ज्योतचं महत्व ? घ्या जाणून

 

महिषासूर हा एक क्रूर राक्षस होता. रंभ नावाच्या राक्षसाला पाण्यात राहणारी म्हैस त्रिहायणीशी प्रेम झाले, तिच्यापासून महिषासुर या नावाची उपती झाली. यामुळे महिषासुर पाहिजे तेव्हा तो म्हशीचं रूप घेत होता. त्यानंतर तो राजा बनला. राजा बनल्यानंतर तो ब्रम्ह देवाची तपस्या करायला लागला. त्यांनी ती तपस्या दहा वर्ष केली. इतके वर्ष तपस्या केल्यानंतर ब्रम्ह देव त्याला प्रसन्न झाला आणि ब्रम्ह देवांनी त्याला वरदान मागायला सांगितले.

महिषासुरानी ब्रम्ह देवाला सांगितले की मला कायम अमर ठेव असे वरदान मागितले. तेव्हा देव त्याला बोले की मी तुला हे वरदान नाही देऊ शकत हे सुष्टीच्या नियमाच्या विरुद्ध आहे. तू दुसरे काही वरदान माग मी ते देईल. मग महिषासुर म्हणाला की मला देव दानव, आणि मानव यांच्या पैकी कोणीच मारू शकणार नाही असे वरदान द्या. तेव्हा ब्रम्ह देव म्हणालेकी विचार कर परत एकदा त्यावेळी महिषासुर बोला की या जगात कोणीच नाही मला मारणार. त्यामध्ये फक्त स्त्रिया आहेत ते सुद्धा मला नाही मारू शकत. असा प्रकारे त्यांनी वरदान प्राप्त केले.

महिषासुराला वरदान प्राप्त झाल्यानंतर तो सगळीकडे आणि सर्व देवांवर आक्रमण करायला निघाला. आणि युद्धामध्ये त्यांनी बऱ्याच देवानांचा पराभव केला. त्या युद्धामध्ये त्यांनी इंद्रा देवाला सुद्धा हरवले होते. तेव्हा इंद्रा रागावून एकदम ब्रम्ह देवाकडे गेला आणि त्यांना सर्व काही सांगितले. त्यानंतर ब्रम्ह देव इंद्राला आणि बाकी देवांना घेऊन शंकरा कडे गेले. आणि शंकर देवाला सर्व काही प्रकार सांगितला. त्यानंतर शंकरानी सांगितले की, तुम्हाला दुर्गा मातेला प्रसन्न करावे लागेल. त्यानंतरच त्या राक्षसाचा वध होईल. हे ऐकल्यानंतर सर्व देवांनी देवीला आवाहन दिले. आणि देवी तिकडे प्रकट झाली. आणि सर्व देवांनी तिच्याकडे मदत मागितली आणि सांगितले की आम्हाला या महिषासुराच्या राक्षसापासून वाचव. मग देवी म्हणाली की तुम्ही निश्चित राहा. आणि तिथून देवी निघाली आणि महिषासुरासोबत लढायला निघाली.

महिषासुराचा अन्याय देवांवर भारी पडायला लागला आणि महिषासुराने दुर्गा देवीला लग्नासाठी विचारले होते. तेव्हा दुर्गा मातेने त्याच्यावर वार करत युद्ध सुरु केले, तेव्हा दुर्गा मातेने महिषासुर च्या अनेक सेनापतींना मृत्यूदंड दिला. दुर्गा मातेचे हे युद्ध नऊ दिवस चालत होते आणि दहाव्या दिवशी त्या महिषासुराचा दुर्गा मातेने वध केला. असा प्रकारे देवतांनी दुर्गा मातेचा जय जयकार करून केलेल्या मदतीसाठी धन्यवाद व्यक्त केले. आणि एका स्त्री च्या हातून स्त्रीला कमजोर समजणारा राक्षस मारला गेला. स्त्रियांना कमजोर समजू नये स्त्रियां मध्ये देवीचे अनेक रूप आहेत. स्त्रियांचा मानसन्मान केला पाहिजे.

हे ही वाचा :

Navratri 2022 : नवरात्र हा सण का साजरा केला जातो ?

 

Latest Posts

Don't Miss