spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोरड्या त्वचेसाठी मधाचा वापर करावा

काही लोकांची त्वचा खूप तेलकट असते. काहींची त्वचा कोरडी आणि तेलकट असते. थंडी मध्ये कोरडी त्वचा आणखी कोरडी होते. तुम्ही कितीही स्किन केअर प्रोडक्ट्स लावले तरी त्रास कमी होत नाही. अशा वेळी तुम्ही तुमच्या त्वचेसाठी , मधाचा वापर करू शकता. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मधाचा वापर वर्षानुवर्षे केला जातो. मधामध्ये काही घटक असतात जे त्वचेचा कोरडेपणा कमी करतात. मधामध्ये काही घटक असतात जे त्वचेचा कोरडेपणा कमी करतात.

हे ही वाचा : अशी करा घरच्या घरी चमचमीत खमंग भोपळ्याची भाजी

कोरड्या त्वचेसाठी मधाचे फायदे –

 

मधामध्ये अनेक घटक असतात, जे त्वचेची नैसर्गिकपणा राखतात . त्वचेसाठी मध वापरल्यास त्वचा मुलायम, आणि निरोगी बनते. मधाचा नियमित वापर केल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या जसे की एक्जिमा आणि सोरायसिसची लक्षणे कमी होतात. यामुळे तुमची त्वचा जास्त कोरडी होणार नाही. या त्वचेच्या समस्यांसोबतच भाजणे, कापले जाणे, जखमा, सूज या समस्याही मधाने बरे होतात. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.

 

कोरड्या त्वचेसाठी मधाचा फेस पॅक-

 

मध आणि केळीने तयार केलेला फेस पॅक कोरड्या त्वचेची समस्या देखील कमी करतो. एका भांड्यात मध घ्या आणि ,१ चमचा मध आवश्यकतेनुसार घ्यावे. हे दोन्ही साहित्य चांगले मिक्स करावे. हे पॅक चेहऱ्यावर १५मिनिटे राहू द्यावे आणि नंतर थंड पाण्याने धुवावे. यामुळे त्वचेचा कोरडेपना कमी होण्यास मदत मिळते. मध, दूध आणि बेसन मिसळून फेस पॅक बनवा. यासाठी तुम्हाला एक चमचा मध, दोन चमचे दूध आणि एक चमचा बेसन आवश्यक आहे. एका भांड्यात हे तिन्ही मिक्स करून चेहऱ्यावर आणि मानेला लावा.

हे ही वाचा :

आता भाजपला चित्ता सरकार म्हणायचं का?, उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल

 

Latest Posts

Don't Miss