spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पावसाळ्यात सतत गरम पाणी पिणे तब्येतीसाठी चांगले की घातक

गेल्या अनेक दिवसांपासून हवेत गारवा आणि पाऊसही अजून चालूच आहे. अशा वातावरणात अनेकांना सर्दी, घसा खवखवणे, भूक कमी, अंगदुखी असा त्रास होत आहे. अजूनही कोरोनाची भीती मनात आहेच. त्यामुळे जरा नाक वहायला लागलं की वाफ घेणं, सतत गरम पाणी पिणं अनेकजण सुरु करतात. तर पावसाळ्यात गरम पाणीच प्यायचं असाही काहीचं समज असतो. पण खरंच असं सतत गरम पाणी प्यावं का? त्याचा तब्येतीला फायदा होतो की तोटा? कोरोनाकाळात सतत वाफ घेल्यानं भाजल्याच्या घटना तर होत्याच, पण खूप गरम पाणी पिऊन कुणाचे वजन कमी झाले तर खूप गरम काढे पिऊन काहींना मूळव्याध, अपचन, पित्त यांचाही त्रास सुरु झाला. अतिरेक केल्यानं तब्येतीवर चांगल्या गोष्टींचाही वाईट परिणाम होण्याचा धोका असतोच.

हेही वाचा : 

राऊतांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका करत म्हणाले, त्या अडाण्याच्या…

फक्त गरम पाणीच प्यावं का?

सतत गरम, कडक पाणी प्यायची काहीच गरज नाही.

कोमट, घशाला बरं वाटेल असं पाणी सर्दी -खोकला असेल, घसा तडतडत असेल तर थोडं थोडं प्यायला हरकत नाही.

ज्यांना खूप आणि सतत सर्दी होते त्यांनी स्वत:च्याच मनानं गरम पाणी फार पिऊ नये, डॉक्टरांना विचारुनच प्यावे.

सकाळी उठल्या उठल्या चहा पितो तसे कडक गरम पाणी पिणे सगळ्यांसाठीच योग्य नाही. आपल्या डॉक्टरला विचारुनच त्यासंदर्भात निर्णय घ्यावा.

गरम पाण्यानं गुळण्या करणं फायदेशीर. घशाला शेक बसेल इतपत पाण्यात थोडं मीठ आणि हळद घालून गुळण्या करणं योग्य.

आलं,हळद, ओवा घालूनही काहीजण गरम पाणी पितात मात्र त्याचा अतिरेक ॲसिडीटी, पचनाचे त्रास यांना आमंत्रण देऊ शकतो.

रात्री झोपताना गरम पाणी प्यावे.

भूक लागली की खावे, तहान लागली की पाणी प्यावे. अतिरेक कुठलाही वाईटच.

Adipurush : प्रभास आणि क्रिती सॅनन पडले प्रेमात?,आदिपुरुषच्या सेटवर वाढली जवळीक

Latest Posts

Don't Miss