spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Raj Thackeray Live : वेदांता प्रकल्प गुजरातला गेला कसा याची चौकशी करा, राज ठाकरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) पुढचे पाच दिवस म्हणजेच २२ सप्टेंबर २०२२ पर्यंत विदर्भात (Vidarbha) असणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) पुढचे पाच दिवस म्हणजेच २२ सप्टेंबर २०२२ पर्यंत विदर्भात (Vidarbha) असणार आहेत. या काळात ते केवळ नागपूरच नव्हे तर विदर्भातील इतरही विविध जिल्ह्यांना भेट देणार आहेत. या पाच दिवसांच्या दौऱ्यात ते अनेक पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. काही लोकांचे पक्षप्रवेशही पार पडतील असे सांगितले जात आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा म्हणून उल्लेख केला जातो आहे. याच सर्व पार्श्ववभूमीवर राज ठाकरे यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली आहे.

राज ठाकरे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेत असताना त्यांनी मनसे बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. मनसेची कार्यकारिणी बरखास्त केल्याची मोठी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. “काल मी सर्व पदाधिकाऱ्यांना भेटलो. पक्षाच्या अंतर्गत बदलांबाबत आणि पक्षविस्ताराबाबत चर्चा केली. या चर्चेनंतर मी पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. नागपूर शहर आणि ग्रामीण शहरातील सर्व पदं बरखास्त करतोय. दि २६ सप्टेंबर रोजी घटस्थापनेला नविन पदं जाहिर करणार आहे”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत . तसेच नवीन अनेक लोकांना या मध्ये संधी देण्यात येणार आहे असे देखील राज ठाकरे यांनी स्प्ष्ट केले आहे. तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले आहेत नवरात्री झाल्यानंतर कोल्हापूर मार्गे ते कोकण दौरा करणार आहेत. त्यानंतर पुन्हा २ ते ३ दिवस नागपूरला येऊन सर्व बांधणीवर लक्ष देणार आहे. असे राज ठाकरे यांनी स्प्ष्ट केले आहे.

आज पक्षाला १६ वर्षे झाली परंतु ज्या प्रकारे नागपूरमध्ये पक्ष दिसायला पाहिजे त्या प्रकारे पक्ष दिसत नाही आहे. नागपुरात अनेक उमेद घेऊन तरुण – तरुणी दिसून येत आहेत त्यांना योग्य संधी देणे, त्यांना पद देणं गरजेचं आहे असं मला वाटत म्हणून हि कार्यकारिणी बरखास्त केली आहे असे देखील राज ठाकरे म्हणाले आहेत. नागपूर महानगरपालिकेत (NMC) अनेक दशकांपासून भाजपची सत्ता आहे. प्रस्थापित सत्तेला आव्हान दिल्याशिवाय मोठं होता येत नाही. त्यामुळे आम्ही नागपुरात भाजपविरुद्ध (MNS against BJP in Nagpur) लढू आणि पक्षाला नक्कीच नागपूरकर (Nagpur) साथ देतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

तसेच सध्या राज्यात गाजत असलेल्या फॉस्ककॉन प्रकरणावरून ( Foxconn case) राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी भाष्य केलं आहे. फॉस्ककॉन प्रकरणाची चौकशी व्हावी असंही राज ठाकरे म्हणाले. राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? असा सवाल करत नेमकं कुठं फिस्कटलं याची चौकशी व्हावी, असं राज ठाकरे म्हणाले. या प्रकरणात पैशांची मागणी केली गेली आहे का याचीही चौकशी व्हावी असं ते म्हणाले.

पुढे राज ठाकरे म्हणाले की, राजकारण वैयक्तिक नसतं, वैचारिक धोरणांवर मी टीका करतो. माझा काय धोरणांना विरोध होता. पंतप्रधान मोदींवरही वैयक्तिक टीका केली नाही, त्यांच्या धोरणांवर टीका केली, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं. मनसेने मविआ सरकारचं कधीच कौतुक केलं नाही. सत्ताधाऱ्यांविरोधात लढूनच पक्ष मोठा होत असतो, असंही ते म्हणाले.

भाजप शिवसेनेच्या युतीच्या काळात भाजपनं कधीच मुख्यमंत्री पदाची मागणी केली नाही. त्यावेळी १९८९ साली ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री ठरले होते, मग शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. आता मात्र मतदान होतं, निकाल लागतो आणि नंतर वाट्टेल त्या प्रकारे निर्णय घेतले जातात. पंतप्रधान मोदी, अमित शाह हे प्रचारावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असं बोलत होते, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आक्षेप का घेतला नाही? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला. निवडणुका झाल्या, निकाल लागले आणि मग यांना आठवलं. लोकांनी काय फक्त खेळ पाहच राहायचं का? दोन तास रांगेत, उन्हात उभं राहून मतदान करायचं आणि हे वाटेल तशी प्रतारणा करणार. त्यामुळे हा प्रश्न फक्त विदर्भापुरता मर्यादित नाही, तर महाराष्ट्राचा आहे. ज्या लोकांनी मतदान केलं आहे, त्यांचा अपमान केला आहे. या सर्व गोष्टी त्यांच्यासमोर घेऊन जाणं महत्त्वाचं आहे”.

“तुम्ही युती, आघाडी करुन निवडणुका लढवता, आश्वासनं देता आणि मतदार दोन-दोन तास उभं राहून मतदान करतात. ते केल्यानंतर निकाल लागतो तेव्हा कोणी सकाळी जाऊन राज्यपालांकडे शपथविधी करतं. मग भाजपा, राष्ट्रवादी एकत्र येतात. दोन तासात फिस्कटतं, त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येतात. मला ही गोष्ट कळलेलीच नाही,” अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

हे ही वाचा:

राज ठाकरे पोहोचले नागपुरातील फुटाळा तालाबमधील फाउंटन शो पाहण्यासाठी

माँसाहेब कधीही कोणत्या व्यासपीठावर दिसत नव्हत्या, मग रश्मी ठाकरे का दिसतात? – रामदास कदम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss