spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

टीम इंडियाची नवी ‘बिलियनच अर्स जर्सी’ लाँच

टीम इंडियाच्या नवीन जर्सीचे अनावरण रविवारी १८ सप्टेंबर रोजी होणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी करण्यात आले. भारतीय जर्सीमध्ये आकाश निळा रंग पुन्हा परतला आहे. नोव्हेंबर २००७-२००८ दरम्यान टीम इंडियाने शेवटच्या वेळी आकाश निळ्या रंगाची किट दिली होती; जर्सी प्रामुख्याने २००७ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी सादर करण्यात आली होती आणि त्याच वर्षी, एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील तरुण भारतीय संघाने त्याच किटसह टी २० विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती.

भारतीय संघ सध्या परिधान करत असलेली जर्सीचा रंग ‘नेव्ही ब्लू’ आहे. मात्र आता भारतीय संघाच्या जर्सीचा रंग निळा आहे. गेल्या विश्वचषकाच्या जर्सीला ‘बिलियनच अर्स जर्सी’ असे नाव देण्यात आले होते आणि त्याचा पॅटर्न टीम इंडियाच्या चाहत्यांपासून प्रेरित होता. यावेळी बीसीसीआयने ट्विट करून प्रत्येक क्रिकेट चाहत्याला लिहिले, “भारतातील सर्व क्रिकेट चाहत्यांनो, ही तुमच्यासाठी आहे. सादर करत आहोत नवीन टी २० जर्सी – वन ब्लू जर्सी”.

टीम इंडियाचा अधिकृत कीट पार्टनर एमपीएल स्पोर्ट्स आहे. एमपीएल ने नवीन किटचे डिझाइन आणि पॅटर्न बदलला आहे. यावेळी दोन छटा पाहायला मिळाल्या आहेत. तर, बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्टमध्ये नवीन जर्सी परिधान केलेल्या खेळाडूंचा फोटो शेअर केला. यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि महिला संघातील सदस्य हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा आणि रेणुका सिंग यांचा समावेश आहे.

 ऑस्ट्रेलिया मध्ये होणाऱ्या आगामी आयसीसी ती-२० विश्वचषक २०२२ मध्ये १६ ऑक्टोबरपासून १३नोव्हेंबर पर्यंत एकूण ४६ सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. मंगळवारी मोहाली येथे तीन टी २० सामन्यांच्या पहिल्या सामन्यात भारतीय पुरुष संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध नवीन किट देईल. तीन सामन्यांच्या टी २०I मालिकेनंतर, टीम टी २० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी भारत दक्षिण आफ्रिकेशी आणखी तीन टी २० सामने खेळेल.

हे ही वाचा:

राज ठाकरे पोहोचले नागपुरातील फुटाळा तालाबमधील फाउंटन शो पाहण्यासाठी

शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट

संजय राऊत यांची आज सुटका होणार कि पुन्हा कोठडी ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss