spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नंदुरबारमध्ये भाजपचा धुरळा,शिंदे विरुद्ध लढतमध्ये भाजप आघाडी, ९ ग्रामपंचायतींवर कमळ फुलणार

आज राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून नंदुरबारमधील लढत विशेष मानली जात आहे. कारण नंदुरबार तालुक्यात शिंदे गट विरुद्ध भाजपा अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. या लढतीत आता भाजपानं शिंदे गटाला मागे टाकल्याचे सुरुवातीच्या कलांवरुन दिसून येत आहे. आतापर्यंतच्या जाहीर निकालानुसार एकूण १३ ग्रामपंचायतींवर भाजपाची सत्ता असणार आहे. तर, शिंदे गटाच्या खात्यात ४ ग्रामपंचायती गेल्या आहेत. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला खातंही उघडता आलं नाही.

निकाल

भाजपा – १८

शिंदे गट – १४

काँग्रेस – ०४

राष्ट्रवादी – ०

अपक्ष – ०४

नंदुरबारमध्ये एकूण १४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. यातील १२ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली. यातील भाजपाकडे ७ तर शिंदे गटातील ५ ग्रामपंचायतींचा समावेश होता. आता १३७ ग्रामपंचायतीसाठीची मतमोजणी सुरू आहे. सोमवारी ११ वाजेपर्यंत २० ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले असून. आता त्यात ९ भाजप, ५ शिंदे गट व इतर ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे. यापूर्वी बिनविरोध झालेल्या १२ ग्रामपंचायतींपैकी भाजप ७, तर शिंदे गट ४ व इतर १ असा दावा करण्यात आला आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा : 

Raj Thackeray Live : वेदांता प्रकल्प गुजरातला गेला कसा याची चौकशी करा, राज ठाकरेंचा हल्लाबोल

नंदुरबार तालुक्यातील एकूण आमराई, आष्टा, बिलाडी, अजेपूर, काळंबा, जळखे या ग्रामपंचायतींवर भाजपानं विजय प्राप्त केला आहे. तर पाचोराबारी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा विजय झाला आहे.

तर, जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसनं खातं उघडलं आहे. सत्रासेन ग्रामपंचायतीच्या ११ पैकी १० जागा आणि सरपंचपदावर मजल मारली आहे. त्यानंतर शिवसेनेनंही खातं उघडलं, बोरमळी-देव्हारी ग्रुप ग्रामपंचायतीत शिवसेनेचा सरपंच निवडून आला आहे. सरपंच जनाबाई किसन पाडवी यांची निवड झाली आहे. तर जळगावात शिंदे गटाचा पहिला सरपंच विजयी झाल्या आहे. मोहरद ग्रामपंचायतीत अंजुम रमजान तडवी या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट

दरम्यान, नाशिक तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी काल पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली असून. यात १६ ग्रामपंचायत पैकी ८ ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून, यात ८ ग्रामपंचायतीत शिवसेना २,भाजप १, राष्ट्रवादी ३, काँग्रेस १ स्वराज्य संघटना १ असा निकाल हाती आला आहे. नाशिक तालुक्यात शिंदे गटाला खातं उघडता आलं नसलं तरी संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेने नाशिक तालुक्यात एका जागेवर खातं उघडलं आहे

संजय राऊत यांची आज सुटका होणार कि पुन्हा कोठडी ?

Latest Posts

Don't Miss