spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बेरोजगार आहात.. तर तुमच्यासाठी नवी संधी चालून आली आहे ; NFL मध्ये आली नवी भरती त्वरा करा

नोकरीच्या संधीच्या शोधात आहात ? मिळत नाही ? शोधून थकला आहात ? तर आता तुम्हाला कुठेही शोधाशोध करण्याची गरज नाही. आता आपल्या जिल्ह्यात आपल्याच आजूबाजूला नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर ही एक अत्यंत मोठी बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करावीत. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलीये.

नॅशनल फर्टिलायझर्स लि. (National Fertilizers Limited) मध्ये नवीन भरती निघाली असून यासाठीची नोटिफिकेशन संबंधित संकेतस्थळावर जारी झाले आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

एकूण रिक्त जागा :
१६४

रीक्त पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी, शाखा आणि पद संख्या

  • केमिकल – ५६
  • मेकॅनिकल – १८
  • इलेक्ट्रिकल – २१
  • इन्स्ट्रुमेंटेशन – १७
  • केमिकल लॅब – १२
  • सिव्हिल – ०३
  • फायर सेफ्टी – ०५
  • IT – ०५
  • मटेरियल – ११
  • HR – १६

वायोमर्यादा :

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३१ मे २०२४ रोजी १८ ते २७ वर्षे असणे गरजेचे आहे.
  • SC/ST: ०५ वर्षे सूट
  • OBC: ०३ वर्षे सूट

परीक्षा फी :

  •  जनरल/ओबीसी/EWS: ७०० रु.
  • SC/ST/PWD/ExSM: कोणतीही फी आकारली जाणार नाही. यांच्यासाठी ही विनामूल्य आहे.

दरमहा किती पगार असेल ?

४०,००० रुपये  ते १,४०,००० रुपये

नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:
१७ जुलै २०२४

नोकरीचे ठिकाण हे देशभरात कुठेही असू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवाराने भरतीची अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावा.

हे ही वाचा:

MLC ELECTION 2024 VOTING : MAHAYUTI ची आघाडी ; मात्र MAHAVIKAS AGHADI मध्ये ८ मतांची बिघाडी

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : “Home guard जवानांना १८० दिवस काम देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा” ; Satyajeet Tambe यांनी सभागृहात केली मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss