Saturday, July 6, 2024

Latest Posts

FYJC Admition: कला, वाणिज्य आणि विज्ञान कोणत्याशाखेकडे विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त कल ?

या प्रवेश प्रक्रियेला मोठा वेग आला आहे. मुंबई विभागासाठी अकरावी प्रवेशासाठी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. यामध्ये ९ विद्यार्थी १००% असणार आहेत. मुंबई विभागातील सर्वांना प्रवेश मिळणार आहे. या गुणवत्ता यादी नुसार २ लाख ४७ हजार ६६४ जागांसाठी २ लाख ३८ हजार ९५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

जून महिना सुरु झाला आणि पावसासोबतच शाळा, महाविद्यालये यांचीही सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना जून महिन्यातच एका पाठोपाठ एक खुशखबरी मिळत गेल्या. पहिली खुशखबर होती ती म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेशवाटप, त्याचसोबत त्यांचं शाळांमध्ये खूप विशेषत्वाने स्वागत करण्यात आले. दुसरी महत्वाची व विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी हाती आली ती म्हणजे एसटी, बस पास विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच मिळणार आहे. या सर्व गोष्टी खास शालेय विद्यार्थ्यांसाठी करण्यात आल्या. पण आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही महत्वपूर्ण आणि त्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

ज्यांची १० वी या वर्षात पूर्ण झाली त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षण खूप महत्वाचे आहे. आता त्यांच्या आयुष्यातील एक नवे वळण, एक नवा टप्पा सुरु होणार आहे. तो टप्पा अधिक सुकर व्हावा म्हणून ही बातमी आहे. १०वी नंतर पुढील शिक्षणासाठी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे. या प्रवेश प्रक्रियेला मोठा वेग आला आहे. मुंबई विभागासाठी अकरावी प्रवेशासाठी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. यामध्ये ९ विद्यार्थी १००% असणार आहेत. मुंबई विभागातील सर्वांना प्रवेश मिळणार आहे. या गुणवत्ता यादी नुसार २ लाख ४७ हजार ६६४ जागांसाठी २ लाख ३८ हजार ९५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे मुंबई विभागात उपलब्ध जागांपेक्षा कमी अर्ज यंदा आले आहेत. ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. अकरावी प्रवेशाची सामान्य गुणवत्ता यादी २७ जून २०२४ रोजी जाहीर होणार आहे.

मुंबई विभागातील विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त पसंती ही वाणिज्य शाखेला दिली आहे. या शाखेसाठी १,२०,००० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर कला शाखेसाठी २०,४२९ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. विज्ञान शाखेच्या ९३,८९५ विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. ही प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात होणार आहे. पहिली सामान्य फेरी होईल त्यांनतर विशेष फेरी होईल त्यातून पुढील प्रक्रिया पार पडली जाईल.

या तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील माहितीनुसार ५४% विद्यार्थ्यांना ९९ ते ९९.९९% गुण मिळाले आहेत. तर १ लाख १० हजार विद्यार्थ्यांना ६० ते ७९.९९% गुण मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळांच्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) २,३४००० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. याशिवाय आयसीएसईच्या (ICSE) १३,८३७ तर सीबीएसईच्या (CBSE) १०,८५८  च्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील माहिती आणि अचूकता तपासून विद्यार्थ्यांना २१ जून पर्यंत दुरुस्तीसाठी विनंती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, अमरावतीमध्ये केंद्रीय प्रवेश प्रकियेद्वारे अकरावीचे प्रवेश दिले जातात. मुंबईतील अकरावीच्या एकूण जागांपेक्षा कमी अर्ज दाखल झाल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल. दुसरीकडे मुंबईतील विद्यार्थ्यांचा कल हा विज्ञान आणि कला शाखेच्या तुलनेत वाणिज्य शाखेकडे सर्वाधिक आहे. आपल्या मुलांना वाणिज्य (Comerce) शाखेतून शिक्षण देण्यासाठी मुंबईतील बहुतांश पालक आग्रही असल्याचं चित्र आहे. वाणिज्य (Arts) शाखेपाठोपाठ विद्यार्थ्यांची विज्ञान (Sience) शाखेला पसंती आहे. सर्वात कमी प्रतिसाद कला शाखेला मिळत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा

PIXAR च्या INSIDE OUT 2 या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात केली रेकॉर्ड ब्रेक कमाई

मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम….राष्ट्रवादी शरद पवार गटाचे टीकास्त्र कोणावर?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss