दहावी उत्तीर्ण इच्छुकांना सुवर्णसंधी; ITBP मध्ये चालक पदाची भरती

आयटीपीबीमध्ये कॉन्स्टेबल चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असून या पदाच्या ५४५ जागांवर भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

दहावी उत्तीर्ण इच्छुकांना सुवर्णसंधी; ITBP मध्ये चालक पदाची भरती

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच आयटीपीबीमध्ये चालक या पदांच्या भरतीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. भारताच्या निमलष्करी दलांपैकी आयटीपीबी (ITPB) हे एक दल आहे. आयटीपीबीमध्ये कॉन्स्टेबल चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असून या पदाच्या ५४५ जागांवर भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

आयटीपीबीच्या जाहिरातीनुसार एकूण ५४५ जागांपैकी खुल्या प्रवर्गासाठी २०९ जागा असतील, तर अनुसूचित जाती ७७, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ४०, ओबीसीसाठी १६४ आणि ईडब्ल्यूएससाठी ५५ जागा राखीव राहणार आहेत. एकूण जागांपैकी १० टक्के जागा माजी सैनिकांसाठी राखीव असतील. आयटीपीबीमधील कॉन्स्टेबल चालक हे पद पुढील काही काळात कायमस्वरूपी पदांमध्ये रूपांतर होऊ शकते. कॉन्स्टेबल चालक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना भारतात आयटीपीबीकडून जिथे नियुक्ती केली जाईल तिचे नोकरी करणे बंधनकारक असेल.

आयटीपीबीमधील कॉन्स्टेबल चालक या पदासाठी अर्ज भरण्यास ८ ऑक्टोबरला सुरुवात होईल तर ६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. आयटीपीबीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज सादर करता येतील. यासाठी उमेदवाराचे वय २१ ते २७ दरम्यान असणे अनिवार्य आहे. चालक पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहेत तर, माजी सैनिक आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज हे विनाशुल्क असणार आहेत. चालक या पदासाठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना २१७००-६९१०० या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळेल.

आयटीपीबीमधील कॉन्स्टेबल चालक या पदासाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी प्रथम जाहिरात वाचणे आवश्यक आहे. आयटीपीबी ने निश्चित केलेल्या अटींनुसार उमेदवार हा भारतातील कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाकडून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडे वैध अवजड वाहने चालवण्याचा परवाना असणे अनिवार्य आहे.  उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर फिजिकल एफिशियन्स टेस्ट, फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट, लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यानंतर प्रात्याक्षिक परीक्षा घेतली जाईल. हे दोन टप्पे पार केल्यानंतर मेडिकल टेस्ट होईल.

 

लोकशाही आणि लोकशक्तीला घाबरणारे हे डरपोक सरकार, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांवरून Sanjay Raut यांचा महायुती सरकारवर निशाणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version