Tuesday, July 2, 2024

Latest Posts

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील नागरिकांना नवी खुशखबर !

होतकरू विद्यार्थी व पालकांसाठी शासन नेहमी काहींना काही नवनवीन उपाययोजना आखात असते. जेणे करून अखिल मानवजातीवर त्याचा चांगला पडसाद उमटून येऊ शकेल.

होतकरू विद्यार्थी व पालकांसाठी शासन नेहमी काहींना काही नवनवीन उपाययोजना आखात असते. जेणे करून अखिल मानवजातीवर त्याचा चांगला पडसाद उमटून येऊ शकेल. त्याचप्रमाणे समाजातील कोणताच घटक हा प्रवाहाबाहेर जाऊ नये. या दृष्टीने शासन अथक प्रयत्न करत असते. आताही अशीच एक नवी योजना आपण या लेखात पाहणार आहोत. यात आपण संपूर्ण इत्यम्भूत माहिती देणार आहोत.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद(Aurangabad ZP) संपूर्ण जिल्ह्यासाठी काही नव्या योजना घेऊन आली आहे. या ZP योजनेअंतर्गत विविध योजना दरवर्षी राबवल्या जातात यावर्षी सुद्धा जिल्हा परिषदे अंतर्गत लॅपटॉप, झेरॉक्स मशीन, कडबा कुट्टी मशीन, पिको फॉल मशीन, मिरची कांडप यंत्र व इतर सुविधा दिल्या जाणार आहेत. यासोबतच विनाअट घरकुल योजना त्यानंतर दुचाकी (स्कूटर) सुद्धा मिळणार आहे या योजनेची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ असून यासाठी तुम्हाला १५ जुलै चा आत अर्ज सादर करायचे आहेत, हे अर्ज तुम्हाला खाली दिलेल्या पद्धतीने सादर करणे आवश्यक असेल.

योजनेची तपशीवर माहिती :

  • मागासवर्गीय संगणक लॅपटॉप पुरविणे = ४२,००० रुपये
  • मागासवर्गीय झेरॉक्स मशीन पुरविणे = ४३,०७० रुपये
  • मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरविणे = ४३,०७० रुपये
  • मागासवर्गीयांना कडबा कुट्टी यंत्र पुरविणे = २९,००० रुपये
  • मागासवर्गीय महिलांना पिको फॉल मशीन पुरविणे = ९,३०० रुपये
  • मागासवर्गीयांना दुग्ध व्यवसायासाठी गाय म्हैस पुरवठा करणे = ४०,००० रुपये
  • मागासवर्गीयांना मिरची कांडप यंत्र पुरविणे = २०,००० रुपये
  • मागासवर्गीय शेळीपालनासाठी शेळीचे गट पुरविणे = २५,००० रुपये

जिल्हापरिषद ५% टक्के उपअनुग्रहातील दिव्यांगासाठी योजना :

  1. दिव्यांग व्यक्तींना विनाअट घरकुल देण्याची योजना – १,२०,००० रुपये
  2. निराधार निराश्रीता अति तीव्र दिव्यांग व्यक्तींना विनाअट निर्वाह भत्ता – १०,००० रुपये
  3. अस्थिव्यांग व्यक्तींना स्वयंचलित तीन चाकी सायकल स्कूटर विथ अडॉप्शन डिव्हाइसेस – १०,०००० रुपये एवढे देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाच्या किमान २०% रक्कम या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवबौद्ध आणि पाच टक्के दिव्यांगासाठी खर्च करणे आवश्यक असते. त्यानंतर जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वपूर्ण नियम व अटी :

  1. अर्जदार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवबौद्ध या घटकातील असावा.
  2. संगणक योजनेचा अर्जदार बारावी उत्तीर्ण व एमएससीआयटी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र धारक असावा.
  3. पिको फॉल शिलाई मशीन या योजने करिता महिला शिवण काम करत असल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र असावे.
  4. प्रत्येक योजने करता उत्पन्न प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचा असावे.
  5. ज्या योजने करिता विद्युत पुरवठा आवश्यक आहे त्याकरिता विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असावे.
  6. ४० % किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग तो असल्याबाबतची UDID प्रमाणपत्र.
  7. तहसीलदार यांनी दिलेल्या अधिवस/रहिवासी प्रमाणपत्र.
  8. यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र.
  9. आधार कार्ड चे झेरॉक्स.
  10. घरकुलासाठी आठ चा उतारा.
  11. अर्जदारा ग्रामीण भागातील रहिवाशा असावा.
  12. तहसीलदार यांनी दिलेले वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
  13. स्कूटर विथ ॲडॉप्शन चालवण्याकरिता लाभार्थीकडे परिवहन अधिकारी यांचा परवाना प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

अधिकृत इ-पत्ता  :

[email protected]

शासनचे  परिपत्रक संकेतस्थळ :

https://drive.google.com/file/d/1kNYiJO9Q_1FjrU_N4eGiFpYrHwdxUhqy/view

अर्जासाठीच्या महत्वपूर्ण पायऱ्या :

  • या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर या सर्व वस्तू लाभार्थ्याला मिळणार आहेत.
  • यासाठी पात्र उमेदवाराने १५ जुलै २०२४ या अंतिम तारखेच्या पंचायत समिती कार्यालयाचे सादर करावे.
  • जवळील ठिकाणच्या पंचायत समिती कार्यालयांमध्ये हे परिपत्रक दाखवून लाभार्थी अर्ज सादर करू शकत आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर हे परिपत्रक डाऊनलोड करून अर्ज जमा करावेत.अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ दिले आहे.
या पावसाळ्यात शरीराला तंदुरुस्त करण्यासाठी घ्या ‘हा’ सकस आहार..

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss