Saturday, July 6, 2024

Latest Posts

पशुसंवर्धन आयुक्तालयात ‘ही’ आहे नवी भरती

चांगल्या जॉबच्या (Job) शोधात आहात. पण मिळत नाही आणि जरी मिळाला तरी शिक्षणामुळे मागे पडत आहात तर काळजी करण्याची वेळ आता संपली. तुम्ही १२ वी उत्तीर्ण जरी असाल तरी तुम्हाला चांगला जॉब नक्की लागू शकतो. त्यासाठी तुम्हाला काही कॉम्प्युटर बेसिक कोर्सेस करण्याची गरज आहे.

चांगल्या जॉबच्या (Job) शोधात आहात. पण मिळत नाही आणि जरी मिळाला तरी शिक्षणामुळे मागे पडत आहात तर काळजी करण्याची वेळ आता संपली. तुम्ही १२ वी उत्तीर्ण जरी असाल तरी तुम्हाला चांगला जॉब नक्की लागू शकतो. त्यासाठी तुम्हाला काही कॉम्प्युटर बेसिक कोर्सेस करण्याची गरज आहे. या बेसिक कोर्सेसचे जरी तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरी तुम्हाला प्रथम प्राधान्य मिळणार आहे. कारण पशुसंवर्धन विभागात १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी काही भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने (Department Of Animal Husbandry Government Of Maharashtra) ही जाहिरात प्रकाशित केली आहे. साधारणतः २०२१,२०२२ पासून केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन ही योजना राबवण्यात येत आहे. या अभियानाची स्थापना पशुसंवर्धन आयुक्तालय,औंध, पुणे (Pune) येथे झाली. त्यामुळे इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यात वेटरनरी ग्रॅजूएट(Veterinary Graduate) पदासाठी दोन जागा व डेटा एन्ट्री (Data Entry) पदासाठी २ जागांचा यात समावेश आहे.

वेटरनरी ग्रॅजूएट पदासाठी शैक्षणिक अर्हता (Qualification) :

१. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी
२. पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक
३. एमएससीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असल्यास . अश्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
४. पशुसंवर्धन प्रकल्पात सहभागी असणारे किंवा सेवानिवृत्त असणाऱ्या प्रत्येकास प्राधान्यक्रम देण्यात येईल.

डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठीची शैक्षणिक अर्हता (Qualification) :

१. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे
२. पदवीधर असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
३. एमएससीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
४. इंग्रजी व मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे
५. शासकीय उपक्रमात कामाचा तीन वर्षांच अनुभव असेल तर अधिक उत्तम.

दरमहा पगार किती ?

  • दोन्ही पदांसाठी दरमहा २०,००० रु. ते ५६,००० रुपये असेल.
  • अर्जाची शेवटची तारीख २० जून २०२४ पर्यंत सादर करावे.

निवड प्रक्रिया :

टेस्ट आणि मुलाखत या पद्धतीने निवड प्रक्रिया पार पाडण्यात येईल.

हा अर्ज कोठे व कसा पाठवावा ?

मेलवर किंवा पशुसंवर्धन आयुक्तालयाला स्पीडपोस्ट अथवा कुरिअर पद्दतीने पाठवावे.

  • आयुक्तालयाचा पत्ता -:
    महाराष्ट्र राज्य , पशुसंवर्धन आयुक्तालय,
    स्पायसर महाविद्यालय समोर, औंध, पुणे 411067
  • Email ID :
    [email protected]
  • अधिक माहितीसाठी संकेत स्थळ :
    https://ahd.maharashtra.gov.in

हे ही वाचा

शेतकऱ्यांसाठी नवी खुश खबर ; पंतप्रधानांनी आणली ‘ही’ योजना

‘गरज सरो आणि वैद्य मरो’ ; नवनिर्वाचित खासदार थेट शिवतीर्थावर रवाना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss