Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Job Vacancy :Bombay high Court मध्ये आली आहे नवी जॉबची संधी; जाणून घेऊ सविस्तर

यासाठी एकूण आठ पदांकरिता ही भरती होणार असून जाहिरातीमध्ये नमूद पात्रता व निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.त्या संदर्भात निवड यादी व प्रतीक्षा यादीही प्रसिद्धीच्या दिनांक पासून दोन वर्षासाठी वैध राहील व यामध्ये वेतन २९ हजारापासून पुढे राहणार आहे.

नोकरीच्या संधीच्या शोधात आहात? मिळत नाही? शोधून थकला आहात? तर आता तुम्हाला कुठेही शोधाशोध करण्याची गरज नाही. आता आपल्या जिल्ह्यात आपल्याच आजूबाजूला नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. गरज आहे ती फक्त त्या बारीक नजरेची. कारण आता नागपूर खंडपीठाच्या स्थापनेवर दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नवी जाहिरात प्रकशित करण्यात आली आहे. त्यांनी उमेद्वारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध केली आहे.

यासाठी एकूण आठ पदांकरिता ही भरती होणार असून जाहिरातीमध्ये नमूद पात्रता व निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.त्या संदर्भात निवड यादी व प्रतीक्षा यादीही प्रसिद्धीच्या दिनांक पासून दोन वर्षासाठी वैध राहील व यामध्ये वेतन २९ हजारापासून पुढे राहणार आहे.

शैक्षणिक पात्रता (Bombay High Court Bharti) :

  • उमेदवार कमीत कमी दहावी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा, उमेदवाराला मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराकडे मोटर वाहन अधिनियम १९८८ प्रमाणे वैध व प्रभावीपणे कार्यरत असा किमान हलके मोटर वाहन चालवण्याचा परवाना हा अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून असावा.
  • अर्ज करण्याच्या तारखेस उमेदवाराजवळ किमान तीन वर्ष हलकी किंवा जड मोटर चालण्याचा अनुभव असावा.
  • उमेदवाराचा पूर्व कार्यकाळ वाहन चालक म्हणून स्वच्छ असावा.
  • उमेदवारास मोटर वाहनाचे देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असावे.

वयोमर्यादा :

  • खुल्या प्रवर्गासाठी २१ वर्षे ते ३८ वर्षे एवढी कमाल वयोमर्यादा असून अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग किंवा महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारासाठी मर्यादा २१ वर्षे ते ४३ वर्ष असणार आहे.
  • विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी किमान वयोमर्यादा २१ वर्षे व जास्तीत जास्त वयोमर्यादा लागू राहणार नाही.

अर्ज करण्याची पद्धत :

  • इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे अर्ज सादर करताना मुंबई उच्च न्यायालयाचे संकेतस्थळावरील सूचनाचे काटेकोरपणे पालन केले जावे.
  • प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील इतर कोणत्याही प्रकाराने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
  • पात्रता असलेल्या उमेदवाराने ऑनलाईन अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून १९ जून २०२४ ते ३ जुलै २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्जाची लिंक १९ जून २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता उघडेल आणि दिनांक ३ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता बंद होईल.
  • उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर अर्ज ची प्रिंटआऊट काढावी व सदर अर्जाचे प्रिंटआउट स्वतः जवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावे.
  • अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे कार्यालयात पोस्टाने किंवा इतर माध्यमाने पाठवू नये परंतु निवड प्रक्रियेदरम्यान दिलेल्या सूचनेनुसार आवश्यकतेनुसार सदर अर्जाची प्रत व कागदपत्रे सोबत ठेवणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास उमेदवाराच्या फक्त शेवटच्या अर्जाचा विचार करण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ :

https://bombayhighcourt.nic.in

मूळ जाहिरातिचे संकेतस्थळ :

https://bombayhighcourt.nic.in/writereaddata/recruitment/PDF/recruitbom20240619010101.pdf

अर्जासाठीचे संकेतस्थळ :

https://bhc.gov.in/nagdriverrecruit/home.php

उमेदवारासाठी सूचना :

  • उमेदवारांनी आपली सर्व माहिती योग्यरीत्या भरून झाल्यावर सर्वात शेवटी आय ॲग्री या बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करावा.
  • उमेदवाराला अर्ज करताना नोंदणी शुल्क २०० रुपये ऑनलाईन भरणे आवश्यक आहे सदर शुल्क हे विना परताव आहे त्यासाठी उमेदवाराने मॅन्युअल मध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे.
  • अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त यशस्वीरित्या नोंदणी शुल्क खात्यात जमा झालेल्या व्यवहाराचा विचार करण्यात येणार आहे अर्ज भरल्यानंतर अर्जाची पडताळणी करून उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येईल.
  • उमेदवारांनी मुलाखती करिता जातेवेळेस काही आवश्यक कागदांच्या प्रति सोबत न्यायच्या आहेत त्यामध्ये जन्मतारखेच्या पुराव्याचं दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक, शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्रे, वाहन परवानाची प्रत, महाराष्ट्राच्या अधिवास प्रमाणपत्र व इतर असलेल्या आवश्यक कागदपत्र सोबत न्यावेत.
  • इतर आवश्यक सूचना व (Bombay High Court Bharti) सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेले आहेउमेदवाराने अर्ज करण्याअगोदर मूळ जाहीर डाऊनलोड करावी आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज सादर करावा.

विद्यार्थी अथवा उमेदवारांनी दिलेल्या पदाकरिता तसेच लवकरात लवकर आपले अर्ज पाठवणे अपेक्षित आहे.  तसेच अर्जाआधी मूळ जाहिरात संपूर्णरित्या वाचणे बंधनकारक आहे.

हे ही वाचा

PUNE HIT-AND-RUN: अपघाताप्रकरणी एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना केले मोठे आवाहन..

Chandrakant Patil यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Rohit Pawar आणि Amol Mitakari संतापून म्हणाले, दादा तुम्ही….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss