spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MAHA TET 2024: शिक्षक पात्रता परीक्षेसाठी परीक्षार्थींना अर्ज करण्याचे आवाहन, कधी असणार परीक्षा?

महाराष्ट्र शिक्षक पात्रता (Maharashtra Teacher Eligibility) परीक्षा येत्या 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार असून यासाठी अर्हताप्राप्त परीक्षार्थींनी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (Maharashtra State Examination Council) करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित (Unaided), कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज (Online Form) व शुल्क भरण्याचा कालावधी 30 सप्टेंबर पर्यंत असून 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेता येईल. शिक्षक पात्रता परीक्षेचा पहिला पेपर 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 ते 1 वाजेपर्यंत होणार आहे तर दुसरा पेपर 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 4.30 या वेळेत होणार आहे.

या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या या संकेतस्थळावर देण्यात आला असून सर्व संबंधितांनी या संकेतस्थळास नियमित भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी केले आहे.

नेट (NET) ची उत्तरसूची जाहीर 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने युजीसी नेटची उत्तर सुची (answer key) त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ugcnet.nta.ac.in दिली आहे. २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२४ रोजी युजीसी नेटच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. असिस्टंट प्रोफेसर (AP) आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) या पदांसाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यासाठी वर्षातून दोन वेळा ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा घेतली जात असते. सर्व विषय आणि श्रेणींसाठी कट-ऑफ २१६ ते १६० च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. मानसशास्त्र विषयासाठी, जुनियर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापकांसाठी २०० आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी १९० इतका कट-ऑफ अंदाजे असेल . सर्व विषयांसाठी श्रेणीनिहाय युजीसीने अपेक्षित कट-ऑफ गुण जाणून घेण्यासाठी ugcnet.nta.ac.in या लिंकवर भेट द्या.

हे ही वाचा:

Mukhyamantri Yojana doot साठी अर्ज करण्याची मुदत वाढली, आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

यंदा शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार? शिंदे गटाचा मेळावा दुसरीकडे घेण्याचे संकेत ?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss