MahaTransco Navi Mumbai Recruitment 2024: महाट्रान्सको येथे इलेक्ट्रिशियन या पदाच्या ६४ जागा रिक्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती

MahaTransco Navi Mumbai Recruitment 2024: महाट्रान्सको येथे इलेक्ट्रिशियन या पदाच्या ६४ जागा रिक्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती

महाट्रान्सको नवी मुंबई म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company) येथे ६४ विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या जागा अप्रेंटिसशिपसाठी राखीव असणार आहेत. इच्छुक उमेदवारांना भरतीसाठीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २३ ऑगस्ट २०२४ ही असेल. दिनांक ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्जाची प्रत जमा करणे अनिवार्य आहे. जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे व इतर निकष.

शैक्षणिक पात्रता:
माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक
मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री व्यवसायातील परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

अर्ज प्रक्रिया दिनांक – १२ ऑगस्ट २०२४ ते २३ ऑगस्ट २०२४
अर्जाची पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक.
वय – १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार सहभागी होऊ शकतात.
पद – अप्रेंटिसशिप
मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा – १८ ते ४३ वर्षे
अर्ज जमा करण्यासाठीचा पत्ता – अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ऐरोली नाका, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई ४००७०८ (उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाची प्रत या पत्त्यावर ऑफलाईन अर्जाची प्रत जमा करावी.)

अर्ज करतेवेळी आवश्यक असलेले कागदपत्र:
ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाची प्रत
दहावी ची गुणपत्रिका
आयटीआय च्या सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिका
आधार कार्ड
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
आवश्यकतेनुसार उमेदवाराचे जात प्रमाणपत्र
उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र

भरती संदर्भात किंवा महाट्रान्सको येथील इतर उपक्रमांच्या अधिक माहितीसाठी – https://www.mahatransco.in/
उमेदवारांनी अर्जात खोटी माहिती किंवा खोटी कागदपत्रे जोडल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल. तसेच अर्धवट किंवा चुकीच्या कागदपत्रांसह अर्ज भरल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.

हे ही वाचा:

Badlapur School Case: मी एक बाप आहे अन् त्या ठिकाणी माझी मुलगी असती तर? Jitendra Awhad

CM Shinde विकृत आहेत का? Uddhav यांचा राजकीय सवाल, सेनेची सामाजिक ‘बंद’ची हाक

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version