Saturday, July 6, 2024

Latest Posts

मुंबई आरोग्य विभागात नवी भरती ; जणूयात सविस्तर

मुंबईमध्येच जॉब मिळावा अशी इच्छा आहे. त्यातही तो गव्हर्नमेंटच जॉब हवाय तर आपल्या सर्वांसाठी एक नवी खुशखबर आली आहे.

त्यात तुम्ही विज्ञान शाखेतून किंवा इतर कोणत्याही शाखेतून पदव्यूत्तर आहात. तरीही बेरोजगार आहात. जॉब हवाय. मग काय करू शकतो. मुंबईमध्येच जॉब मिळावा अशी इच्छा आहे. त्यातही तो गव्हर्नमेंटच जॉब हवाय तर आपल्या सर्वांसाठी एक नवी खुशखबर आली आहे.

यामुळे जरी तुम्ही १२ वी पास असलात तरीही चालणार आहे. फक्त थोडा अभ्यास करावा लागेल. आरोग्य विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी ! राज्य आरोग्य संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्याचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने योग्य पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. त्यामुळे त्वरा करा.

पदांचा तपशील :

राज्य आरोग्य संस्था मुंबई(State Health Society Mumbai) अंतर्गत ही भरती राबवण्यात येत आहे. यामध्ये अनेक पदांसाठीची जागा रिक्त आहे. ती पदे पुढीलप्रमाणे आहे.

  • डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry) १ जागा रिक्त आहे.
  • परिचारक (Attendant) या पदासाठी १ जागा 
  • समुपदेशक (Counsellor) या पदासाठी ३ जागा 
  • वरिष्ठ निवासी (Senior Resident Consulant) या पदासाठी १ जागा 
  • सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor/Sr. Consultant) १ जागा रिक्त आहे.  

पगार (Arogya Vibhag Mumbai Bharti ) :

  • सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी १,५०,००० रुपये प्रति महिना 
  • वरिष्ठ निवासी या पदासाठी १,००,००० रुपये प्रति महिना 
  • समुपदेशक या पदासाठी ३५,००० रुपये प्रति महिना 
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी २५,००० रुपये प्रति महिना 
  • परिचारक या पदासाठी २०,००० रुपये प्रति महिना  यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार हा २०,००० ते १,५०,००० पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

शैक्षणिक अर्हता :

उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह २५ जून २०२४ पूर्वी सादर करायचे आहेत, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी १२ वी पास असणे गरजेचे आहे, पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी. त्याचे संकेतस्थळ पुढे दिले आहे. 

वयोमर्यादा :

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष ते जास्तीत जास्त 61 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क :

या जाहिरातीच्या अर्जाकरीता कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

उमेदवारांनी अर्ज आयुक्त, आरोग्य सेवा आणि मिशन डायरेक्टर, राष्ट्रीय आरोग्य मिशन, मुंबई. आरोग्य भवन, 8वा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाउंड, पी’डी मेलो रोड, मुंबई- 400 001 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

सूचना (Arogya Vibhag Mumbai Bharti ) :

उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे. उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत. अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाही दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनीच अर्ज सादर करावेत.

अधिकृत संकेतस्थळ –

https://arogya.maharashtra.gov.in

मुख्य जाहिरात पीडीएफ संकेतस्थळ  :

https://drive.google.com/file/d/1img96VHRrEhY5nAU-shgWcPg_C6ei2xr/view

हे ही वाचा

PIXAR च्या INSIDE OUT 2 या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात केली रेकॉर्ड ब्रेक कमाई

FYJC ADMITION: कला, वाणिज्य आणि विज्ञान कोणत्याशाखेकडे विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त कल ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss