Saturday, July 6, 2024

Latest Posts

NEET Exam: फेरपरीक्षा घेण्यावरून पालक विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट (National Eligibility cum Entrance Test) परीक्षेच्या गैरप्रकार उघडकीस आला आहे. नीट परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट (National Eligibility cum Entrance Test) परीक्षेच्या गैरप्रकार उघडकीस आला आहे. नीट परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. मुंबई (Mumbai) नीटच्या सदोष निकालामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थी-पालकांना दिलासा देण्याऐवजी ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करून राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी विद्यार्थी पालकांच्या दुःखात भर घातली आहे .

वैद्यकीय परीक्षेच्या झालेल्या गैरप्रकाराबाबत हसन मुश्रीफ यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांनी या गैरप्रकाराबद्दल एनटीए (National Testing Agency) या केंद्रीय यंत्रणेकडून चौकशीची मागणी केल्याचे सांगितले आहे. वैद्यकीय परीक्षेच्या निकालावरून विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये संताप व्यक्त होत आहे. या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी बसले होते. या निकालामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या रँकमध्ये ३० ते ४० हजाराचा फरक पडल्याची तक्रार आहे. केंद्रीय विभागाकडून या प्रकरणाची दखल न घेतल्यामुळे ५० ते ६० विद्यार्थी-पालकांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री यांची भेट घेतली.

ग्रेस मार्कांमुळे कट-ऑफ वाढला असून याचा परिणाम वैद्यकीय प्रवेशांवर होणार आहे. ग्रेस मार्क रद्द करून सुधारित निकाल जाहीर करण्यात यावा, तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित करावी असे निवेदन पालकांकडून करण्यात आले. आमच्या झालेल्या संभाषणात फेरपरीक्षेचा उल्लेख कुठेही नव्हता असे पालकांकडून सांगण्यात आले आहे. पालकांचे म्हणणे समजून न घेता फेरपरीक्षेचा घेण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. बाहेर येऊन प्रसारमाध्यमांना दिलेली प्रतिक्रया पाहून शिक्षणमंत्र्यांना आमचे म्हणणे कितपत समजले याबाबत शंकाच आहे असे पालकांकडून सांगण्यात येत आहे. फेरपरीक्षेची मागणी केलेली नसताना शिक्षणमंत्र्यांनी ती जाहीरपणे सांगितली त्यामुळे पालकांमध्ये विनाकारण संताप व्यक्त झाला आहे. आता हायकोर्टशिवाय आम्हाला दुसरा कोणता पर्याय उरला नाही असे पालकांकडून सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

आषाढीवारीच्या मंजूर निधीचे होणार वितरण, AJIT PAWAR यांचे निर्देश

अवधूत गुप्ते वर कोसळला दुःखाचा डोंगर, उपचारादरम्यान आईने घेतला अखेरचा श्वास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss