spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

NEET-UG 2024 : NEET-UG प्रकरणी झाला मोठा निर्णय जाहीर ; पुर्नपरिक्षेची मागणी फेटाळली

राज्यात सर्वात जास्त गोंधळ हा सर्वात मोठ्या प्रकरणामुळे झाले, ते प्रकरण म्हणजे  नीट पेपर फुटी प्रकरण होय. या प्रकरणांबाबत राजकीय विश्वात तसेच शैक्षणिक क्षेत्रातमोठ्याप्रमाणावर उलथ पालथ झाली. या प्रकारामुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक खच्चीकरणाला सामोरे जावे लागले होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर NTA ने NEET परीक्षेचा निकाल वेबसाईटवर अपलोड करण्यात आला होता. मात्र ,NTA ने अपलोड केलेल्या निकालातून गडबड कुठल्या केंद्रात झाली हे स्पष्ट होत नव्हते. असे म्हणत याचिकाकर्ते यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि NTA संचालकांना पत्र लिहिले होते. गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षा २०२४ चा वाद सातत्याने वाढताना दिसतोय. यंदा झालेल्या नीट परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप केला जातोय. ७२० पैकी ७२० मार्क मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना पडल्याने हा सर्व हैराण करणारा प्रकार पुढे आला होता. नीट परीक्षा रद्द करण्याची मागणीच अनेक विद्यार्थ्यांनी केली होती. या प्रकरणी आता मोठा निर्णय समोर आला आहे.

NEET-UG 2024 प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टाने सांगितलं की, NEET-UG 2024 च्या पेपरमध्ये कोणतेही ‘सिस्टीमॅटिक ब्रीच’ म्हणजे पद्धतशीरपणे उल्लंघन झालेलं नाही. म्हणजेच पेपर लीक व्यापक प्रमाणात झालेला नाही.  पेपर लीक फक्त पाटणा आणि हजारीबाग पुरतां मर्यादित होता. मात्र ⁠एनटीएने यापुढे काळजी घ्यायला हवी, असाही निष्कर्ष कोर्टाने नोंदवला. नीट प्रकरणातील पेपर फुटीवरून देशभरातील विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

नीटमधील पेपर फुटीप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने (High Court) सांगितलं की, ⁠आम्ही नीटच्या पुर्नपरिक्षेच्या मागणीला फेटाळतो आहे. ⁠या वर्षी जी गडबड झाली त्यावर केंद्र सरकारनं विचार केला पाहिजे. यापुढे अशा घटना व्हायला नको. ⁠संपूर्ण परीक्षा पद्धतीत कोणताही बिघाड नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. ⁠कोर्टाने कमिटीचा अहवाल तयार करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२४ चा कालावधी निश्चित केला आहे.

हे ही वाचा:

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss