Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Central Bank of India मध्ये आली नवी नोकरीची संधी ; त्वरा करा.

..२० डिसेंबर २०२३ ते ९ जानेवारी २०२४ या कालावधीत या भरतीसाठी अर्ज मागवले होते. त्यानंतर पुन्हा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

जॉब शोधात आहात, पण मिळत नाही. त्यात कमी शिकलेले आहेत आणि तुमचं स्वप्न आहे की गव्हर्नमेंट जॉब (Government Job) लागावा. तर यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये (Bank Of Indea) तरुणांसाठी नोकरी संदर्भातील महत्त्वाची माहिती समोर येत आहे. बँकेतील सफाई कामगार पदांसाठी नोंदणीची प्रक्रिया २१ जूनपासून सुरू होणार आहे.

यानंतर, अर्ज करू इच्छिणारे उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची आणि फी जमा करण्याची अंतिम तारीख २७ जून २०२४ आहे. यानंतर ॲप्लिकेशन विंडो बंद होईल. यापूर्वी २० डिसेंबर २०२३ ते ९ जानेवारी २०२४ या कालावधीत या भरतीसाठी अर्ज मागवले होते. त्यानंतर पुन्हा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या रिक्त पदांची संख्या तुम्ही खाली पाहू शकता.

राज्य व एकूण रिक्त जागा :

एकूण जागा = ४८१ इतक्या आहेत.

  • गुजरात : ७६ जागा
  • मध्य प्रदेश : २४ जागा
  • छत्तीसगड : १४ जागा
  • दिल्ली : २१ जागा
  • राजस्थान : ५५ जागा
  • ओडिशा : ०२ जागा
  • उत्तर प्रदेश : ७८ जागा
  • महाराष्ट्र : ११८ जागा
  • बिहार : ७६ जागा
  • झारखंड : २० जागा

वायोमर्यादा :

या पदांसाठी उमेदवाराला केंद्रीय वेतनश्रेणीनुसार वेतन दिले जाईल. ज्याबद्दल तुम्ही अधिसूचनेत अधिक तपशील पाहू शकता.

  • ३१ मार्च २०२४ रोजी वयाची गणनेनुसार उमेदवारांचे किमान वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि कमाल २६ वर्षे असावे.
  •  राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठीही सूट देण्याची तरतूद आहे.

अर्जाची तारीख :

२१ जूनपासून ते २७ जून २०२४ पर्यंत अर्ज भरू शकणार आहेत.

परीक्षेचे स्वरूप :

  • उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होईल.
  • ही परीक्षा उमेदवार स्वतःच्या स्थानिक भाषेत सुद्धा देऊ शकतो.
  • लेखी परीक्षा ७० गुणांची आणि भाषा परीक्षा ३० गुणांची असेल.

परीक्षा शुल्क :

  • खुला गट – ८५० रुपये
  • अनुसूचित जाती-जमाती, तसेच अपंग उमेदवारासाठी – १७५ रुपये

अधिकृत संकेतस्थळ:

centralbankofindia.co.in 

अधिकृत जाहिरात संकेतस्थळ :

https://www.centralbankofindia.co.in/sites/default/files/HINDI_FINAL_NOTIFICATION%20(1).pdf

मिळालेलय संधीचा उमेदवारांनी उत्तम वापर करून घेणे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी वरील अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊ शकतात.

हे ही वाचा

“संविधानात जे लिहिलंय त्या चौकटीत ते झालंच पाहिजे” ; PANKAJA MUNDE यांनी दिली प्रतिक्रिया

त्वरा करा विद्यार्थ्यांसाठी ‘अच्छे दिन’; शिक्षणासाठी आणली ‘ही’ नवी शिष्यवृत्ती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss