Thursday, July 4, 2024

Latest Posts

NTA कृत UGC-NET परीक्षा रद्द ; केंद्रसरकारच्या शिक्षण मंत्रालयाने दिल स्पष्टीकरण ..

"१९ जून, २०२४ रोजी, विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (१४ C) च्या राष्ट्रीय सायबर क्राइम थ्रेट ॲनालिटिक्स युनिटकडून परीक्षेवर काही इनपुट मिळाले. हे इनपुट प्रथमदर्शनी सूचित करतात की उपरोक्त परीक्षेच्या अखंडतेशी तडजोड झाली असावी. त्यामुळे ही परीक्षा रद्द होऊन नवीन वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर केले जाईल."

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC-NET जून २०२४ परीक्षा OMR (पेन आणि पेपर) मोडमध्ये १८ जून २०२४ रोजी देशातील विविध शहरांमध्ये दोन शिफ्टमध्ये घेतली गेली होती. १९ जून रोजी यु.जी.सी.नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे असे शिक्षण मंत्रालयाने (Ministry of Education) घोषित केले आहे. १८ जून २०२४ रोजी झालेल्या युजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा पुन्हा एकदा नव्याने घेण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्रालयाने परिपत्रक काढले आहे. आधी नीट आणि आता नेट या दोहोंच्या आधी तलाठी भरतीच्या परीक्षेत घोटाळे झाले. या पेपर फुटीच्या घॊटाळ्यांची मालिका सतत चालूच आहे. यामुळे मुलांचे भवितव्य धोक्यात असल्याचे लक्षात येते. ही मालिका पुढे चालूच राहिली तर मात्र या परीक्षांचे पावित्र्य धोक्यात येईल. त्यामुळे या घटनांमुळे या परीक्षांचे गांभीर्य विद्यार्थ्यांना राहणार नाही. यावर शिक्षण मंत्रालयाने विशेषतने लक्ष देणे गरजेचे आहे.

यु.जी.सी.नेट चा पेपर फुटल्याची शंका केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने व्यक्त केली आहे. तसेच या परीक्षेचं पावित्र्य व पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी ही परीक्षा रद्द केली गेली आहे. केंद्रसरकाच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (Press Information Bureau Government of India) यांनी दिलेल्या माहिती नुसार हे निदर्शनास आले आहे.  “१९ जून, २०२४ रोजी, विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (१४ C) च्या राष्ट्रीय सायबर क्राइम थ्रेट ॲनालिटिक्स युनिटकडून परीक्षेवर काही इनपुट मिळाले. हे इनपुट प्रथमदर्शनी सूचित करतात की उपरोक्त परीक्षेच्या अखंडतेशी तडजोड झाली असावी. त्यामुळे ही परीक्षा रद्द होऊन नवीन वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर केले जाईल.” असे अद्यादेशात सांगीतले गेले आहे.

या प्रकरणाचा संपूर्ण तपास हा आता CBI कडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणाची पेपर फुटीसंदर्भातील सखोल  तपासणी केली जाईल.या प्रकरणात जी कुणी व्यक्ती सामील असेल, त्या दोषी व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई केली  जाईल. असे शिक्षण मंत्रालयाने माहिती दिली आहे. दरम्यान, मंगळवारी १८ जून रोजी देशातील विविध शहरांमध्ये १२०० पेक्षा जास्त केंद्रावर दोन टप्प्यांत ही परीक्षा घेण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे ९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळताना दिसत आहे.

 तसेच, परीक्षा प्रक्रियेची सर्वोच्च पातळी पारदर्शकता आणि पावित्र्य सुनिश्चित करण्यासाठी, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने UGC-NET जून २०२४- परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नव्याने परीक्षा घेतली जाईल असेही या त्यांच्या आद्यदेशात सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा

PIXAR च्या INSIDE OUT 2 या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात केली रेकॉर्ड ब्रेक कमाई

FYJC ADMITION: कला, वाणिज्य आणि विज्ञान कोणत्याशाखेकडे विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त कल ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss