spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PMC Recruitment 2024: पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी 46 रिक्त पदांसाठी भरती, ‘या’ ठिकाणी होणार थेट निवड…

पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मंगळवार पेठ पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती होणार असल्याची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. ही मुलाखत ०९ ऑगस्ट २०२४, २३ ऑगस्ट आणि ३० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजेपासून चालू होणार आहे. जाणून घेऊयात सविस्तर या भरतीबाबत.

एकूण पदे:
प्राध्यापक – ०४ जागा
सहयोगी प्राध्यापक – १० जागा
सहाय्यक प्राध्यापक – १४ जागा
वरिष्ठ निवासी – १३ जागा
ट्यूटर/डेमॉन्स्ट्रेटर – ०१ जागा
कनिष्ठ निवासी – ०४ जागा

शैक्षणिक पात्रता :
शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला जाहिरातीत पाहायला मिळेल. संबंधित विषयांमध्ये पदवीधर तथा पदव्युत्तर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे तरी अर्ज करण्याअगोदर मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा :
प्रोफेसर पदासाठी खुल्या प्रवर्ग ५० वर्षे व राखीव प्रवर्ग ५५ वर्षे, असोसिएट प्रोफेसरसाठी खुला प्रवर्ग ४५ वर्ष राखीव प्रवर्ग ५० वर्षे, असिस्टंट प्रोफेसरसाठी खुला प्रवर्ग ४० वर्ष मागास प्रवर्ग ४५ वर्ष, वरिष्ठ निवासी पदांसाठी जास्तीत जास्त ४५ वर्ष, कनिष्ठ निवासी व ट्यूटरसाठी खुला प्रवर्ग ३८ वर्ष मागास प्रवर्ग ४३ वर्ष.

वेतन:
प्राध्यापक या पदांसाठी – १८५००० रुपये
सहयोगी प्राध्यापकसाठी – १७०००० रुपये
असिस्टंट प्रोफेसरसाठी – १००००० रुपये
वरिष्ठ निवासीसाठी – ८०२५० रुपये
कनिष्ठ निवासी व ट्यूटरसाठी – ६४५५१ रुपये एवढा दरमहा पगार देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया : शैक्षणिक पात्रतेनुसार निवड केली जाऊन पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवाराने थेट मुलाखतीस जायचे आहे. मुलाखतीला दोन तास अगोदर संपूर्ण भरलेल्या अर्जांसाहित व कागद्पत्रासहित जाणे आवश्यक असेल.

मुलाखतीचा कालावधी:
प्रोफेसर,असोसिएट प्रोफेसर,असिस्टंट प्रोफेसर पदासाठी- ०९ ऑगस्ट २०२४, २३ ऑगस्ट आणि ३० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ वाजता.
वरिष्ठ निवासी कनिष्ठ निवासी तसेच ट्यूटर या पदासाठी – ०९ ऑगस्ट २०२४, २३ ऑगस्ट आणि ३० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना: https://www.pmc.gov.in/recruitment/recruitmenten-2024.html

हे ही वाचा:

शनिवारी राहणार महाराष्ट्र बंद; ‘या’ सेवा राहणार बंद आणि ‘या’ सुविधा राहणार चालू जाणूयात काय आहेत त्या..

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी मी मैदानात उतरणार.. ; Sharad Pawar यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss