Tuesday, July 2, 2024

Latest Posts

विदेशात शिक्षण घ्यायचयं तर ‘हे’ देश आहेत उत्तम पर्याय

ज्या देशात डिग्रीला मान्यता आहे अशा देशात जाऊन शिक्षण घेणे पसंत करतात. काही देशात मोफत शिक्षण दिले जाते. म्हणूनच आज अशा काही महत्वाच्या बाबी सांगणार आहोत ज्या तुम्हाला परदेशात यूजी शिक्षण घेण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. अशा काही देशांची यादी देत आहोत जिथे तुम्ही बारावीनंतर कमी खर्चात चांगले शिक्षण घेऊ शकता.

अनेक विद्यार्थी बारावीनंतर परदेशी महाविद्यालयांमध्ये यूजी शिक्षण घेण्याचे स्वप्न बघतात. परंतु बरेच विद्यार्थी हे अवाढव्य फी शुल्क आणि विदेशात राहण्याचा खर्च करू शकत नाही. काही विद्यार्थी असेही असतात जे विदेशात कमी खर्चात आपलं शिक्षण पूर्ण करतात. ज्या देशात डिग्रीला मान्यता आहे अशा देशात जाऊन शिक्षण घेणे पसंत करतात. काही देशात मोफत शिक्षण दिले जाते. म्हणूनच आज अशा काही महत्वाच्या बाबी सांगणार आहोत ज्या तुम्हाला परदेशात यूजी शिक्षण घेण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. अशा काही देशांची यादी देत आहोत जिथे तुम्ही बारावीनंतर कमी खर्चात चांगले शिक्षण घेऊ शकता.

  • जर्मनी – जर्मनीत अनेक प्रतिष्ठित कॉलेज आणि विद्यापीठ आहेत. ‘युरोपचा पॉवरहाऊस’ म्हणून जर्मनीचे वर्णन केले जाते. येथील बऱ्याच संस्थांमध्ये शिकवणी शुल्क देण्याची गरज पडत नाही. जर्मनी हे संपूर्ण जगात ट्यूशन फ्री शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. राजधानी बर्लिनसह देशभरातील कॉलेजमध्ये ट्यूशन फी न देता शिक्षण घेता येते.
  • रशिया- रशिया हा भारतीय मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी चांगले शिक्षण घेण्याचे ठिकाण आहे. यूरोप ते आशिया खंडापर्यंत पसरलेला रशिया हा देश भारताचा सहयोगी देश आहे. येथे मेडिकलचे शिक्षण कमी खर्चात होते. पदवीधर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी नोकरी शोधण्यासाठी तेथेच १८० दिवस राहू शकतो.
  • ब्राझील- ब्राझील या देशात पब्लिक युनिव्हर्सिटीत भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी फी शुल्क लागत नाही. मात्र, प्रवेश घेण्यापूर्वी पोर्तुगीज भाषेची टेस्ट द्यावी लागते.
  • नॉर्वे- मोफत शिक्षणासाठी येथील पब्लिक युनिव्हर्सिटीत प्रवेश घेता येतो. बर्गन युनिव्हर्सिटी, युआयटी नॉर्वेची आर्क्टिक युनिव्हर्सिटी विदेशी विद्यार्थ्यांसाठी कमी खर्चात शिक्षण देतात.
  • ऑस्ट्रिया- युरोपियन देशात कमी फी शुल्क घेण्यासाठी ऑस्ट्रिया हा देश विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. बारावी पास विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी व्हियन्ना युनिव्हर्सिटीमध्ये विविध कोर्सेससाठी प्रयत्न करू शकतात.

हे ही वाचा

Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षीच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?

NEET Paper Leak Case: लातूर कनेक्शन आले समोर! एक शिक्षक ताब्यात तर दुसरा फरार!

Latest Posts

Don't Miss