spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बदलापूर प्रकरणी Pune Universityची PhD आणि PET प्रवेश परीक्षा ढकलली पुढे; नवीन तारीखही केली जाहीर

कोलकाता, बदलापूर आणि राज्यात इतर ठिकाणी घडलेल्या महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूर(Badlapur)घटनेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी २४ ऑगस्ट महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र, त्याच दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai fule Pune University) पीएचडी प्रवेशासाठी (पेट) (PhD admission PET exam)पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा घेतले जाणार आहे. परीक्षा केंद्रावर पोहोचताना किंवा परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने पुणे विद्यापीठाने पेट परीक्षा पुढे (Pune University pet exam postpone)ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा २४ ऑगस्ट ऐवजी आता ३१ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. प्रसारमाध्यमात त्या संदर्भातील बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास विलंब अथवा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पुणे ,अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये विविध परीक्षा केंद्रांवर पेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ जून रोजी होणाऱ्या परीक्षेची सर्व तयारी विद्यापीठातर्फे पूर्ण करण्यात आली आहे.सर्व विद्यार्थ्यांना १९ ऑगस्ट पासूनच परीक्षेसाठीचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षेसाठी सुमारे १० हजार ६०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.

परीक्षा केंद्र चालकांनी विद्यापीठाच्या पेट परीक्षेस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास असमर्थता दर्शवली होती. विद्यापीठाने परीक्षेसाठी स्वतःचे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असे परीक्षा केंद्र चालकांनी सांगितले होते. त्यामुळे परीक्षा घेणे अवघड झाले होते.त्यातच महाराष्ट्र बंद मुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अडचणी येऊ शकतात.तसेच परीक्षा घेतली तर महाराष्ट्र बंदमुळे काही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू शकतात. परिणामी विद्यापीठाला पुन्हा परीक्षा घ्यावी लागू शकते. पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा २४ ऑगस्ट ऐवजी आता ३१ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. PET परीक्षेचे (PhD admission PET exam) सुधारीत प्रवेशपत्र लवकरच विद्यार्थ्यांना लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पेट परीक्षेच्या इतर कोणत्याही बाबींमध्ये बदल होणार नसल्याचे शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Exclusive : “महाराष्ट्र बंद राजकीय नाही..” – Uddhav thackeray

Badlapur School Case : मुलींच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय, शैक्षणिक संस्थासाठी दिले ‘हे’ आदेश

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss