Railway Job : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना पुन्हा एकदा रेल्वे विभागात नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर…

Railway Job : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना पुन्हा एकदा रेल्वे विभागात नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर…

Railway Job : जर तुम्हाला रेल्वे विभागात नोकरी हवी असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना ही सुवर्ण संधीच आहे. रेल्वे विभागातून बंपर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेतून पाच हजारांपेक्षाही अधिक शिकाऊ पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज २३ सप्टेंबर २०२४ ते २२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत करता येणार आहे. रेल्वे विभागाच्या नोकरीचा अर्ज कुठे आणि कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती पाहूया.

शैक्षणिक पात्रता : या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. दहावीमध्ये किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

एकूण पदे : शिकाऊ उमेदवारांची एकूण ५०६६ पदे भरली जाणार आहेत.

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी

वेतन : १८ हजार रुपये ते ५६,९०० रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.

वयोमर्यादा : २४ वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतील. त्याचबरोबर नियमानुसार आरक्षण श्रेणीतील उमेदवारांना वयाच्या अटीत सूट असणार आहे.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज भरण्याकरिता १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. मात्र महिलांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : रेल्वे विभागाच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २२ ऑक्टोबर २०२४ असणार आहे.

अधिकृत संकेस्थळ : www.rrc-wr.com या संकेस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या सूचना :
१) शेवटच्या तारखेआधीच म्हणजे २२ ऑक्टोबर २०२४ आधी इच्छुक उमेदवारांना अर्ज भरावे लागणार आहे.
२) उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. गुणवत्तेच्या आधारेच उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे.
३) अर्जदारांचे दहावीचे मार्क आणि आयटीआयचे मार्क बघून गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

Exit mobile version